viral video of a boy who saved imran khan getting praised on internet imran khan firing  
Trending News

Viral Video: 'या' तरुणानं वाचवला इम्रान खान यांचा जीव; सोशल मिडीयावर होतंय कौतुक

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इम्रान खान याच्या पायाला दुखापत झाली आहे. यादरम्यान सोशल मीडिया वर एका तरुणाने इम्रान खान यांचा जीव वाचवल्याचा दावा केला जात आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये सांगितले जात आहे की, या तरुणाने गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला गोळीबार करण्याआधी पाहीले आणि त्याचा हात खाली खेचला.

इतकेच नाही तर हा तरुणाने घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या हल्लेखोराला पकडले. दरम्यान या तरुणाचे सोशल मिडीयावर जोरदार कौतुक होत आहे. पाकिस्तानच्या अनेक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

इमरान खान जीव वाचवणाऱ्या तरुणाचे नाव इब्तिसाम (Ibtisam) असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी लेखक तलत रहीम यांनी म्हटले आहे की या तरुणाने दिवस खराब होण्यापासून वाचवले.

काही लोक हे हा तरूण हीरो असल्याचे म्हणत आहेत. तर एका पाकिस्तानी पत्रकाराने या तरुणाने अनेकांचे जीव वाचवल्याचे म्हटले आहे. खासकरून इम्रान खान यांचा जीव. त्याच्या धाडसाचे कौतुक झाले पाहिजे.

पाकिस्तान तसेच भारतातील सोशल मिडीया यूजर्स देखील या तरुणाचे कौतुक करत आहेत. दरम्यान इमरान खान यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. हा प्रकार इम्रान खान याच्या आजादी मार्च वेळी घडला. इम्रान खान हे ट्रकवर उभे होते. या हल्ल्यात इम्रान खान जखमी झाले आहेत तर एक जणाचा मृत्यू देखील झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Hind Kesari: सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता, विजयला अश्रू अनावर..

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

Tourism Policy: हॉबिट होम्स ते लक्झरी कॅरॅव्हन! नव्या युगातील पर्यटनासाठी सरकारकडून १ कोटींचे बंपर गिफ्ट; रोजगाराची सुवर्णसंधी

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

दक्षिण आफ्रिका : गांधी, संघर्ष आणि मैत्रीचा शतकभराचा प्रवास

SCROLL FOR NEXT