Viral Video Sakal
Trending News

'आप का आना'...' चक्क विमानतळावर महिलेनं अचानक धरला ठेका, डान्स पाहून आजूबाजूचे लोकही शॉक, Video Viral

Viral Video: सलवार कुर्ता घातलेली महिला कुरूक्षेत्रच्या 'आप का आना' या गाणावर विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. तिने अचानक विचित्र डान्स सुरू केल्याने अनेकांना धक्का बसला.

Puja Bonkile

Viral Video: दिल्लीच्या मेट्रो ट्रेनपासून ते मुंबईच्या लोकल ट्रेनपर्यंत अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. काहीजण डान्स करताना दिसतात तर काहीजण स्टंट करताना दिसतात. पण अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुध्ये एक महिला विमानतळावर विचित्र डान्स करत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ @desimojito नावाच्या आयडीवर X वर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई विमानतळावर एका बॉलिवूड गाण्यावर महिला डान्स करत आहे. सलवार कुर्ता घातलेली महिला कुरूक्षेत्रच्या 'आप का आना' या गाणावर विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. तिने अचानक विचित्र डान्स सुरू केल्याने अनेकांना धक्का बसला. काही लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाते होते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'विमानतळांवरही हा व्हायरस पोहोचला आहे"

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी लिहिले की सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण केला आहे तर काहींनी विमानतळ प्राधिकरणांना करावाई करण्याचे आवाहन केले आहे. तर अनेकांनी महिलेच्या डान्सवर खिल्ली उडवली, अनेकांनी अशा वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

नेटकऱ्यांनी व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले की, 'मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की पुढील कार्यकाळात सर्व सार्वजनिक ठिकाणी अशा विचित्र प्रकारांना बंदी घालावी.'

तर एकाने लिहिले - 'विमानतळाची अवस्थाही दिल्ली मेट्रोसारखी झाली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT