Patana IAS Video Esakal
Trending News

Patana IAS Video: गलती से मिस्टेक! लाठीचार्ज दरम्यान 'IAS'वरच पडली पोलिसांची काठी, पाहा व्हिडिओ

Patana IAS Video: आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर आरक्षण बचाओ संघर्ष समितीने पुकारलेल्या 'भारत बंद' दरम्यान बिहारमधून वेगळीच घटना समोर आली आहे.

आशुतोष मसगौंडे

आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर आरक्षण बचाओ संघर्ष समितीने पुकारलेल्या 'भारत बंद' दरम्यान बिहारमधून वेगळीच घटना समोर आली आहे.

वास्तविक, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, मात्र यावेळी पोलिसांकडून खूप मोठी चूक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाठीचार्ज सुरू असताना पोलिसांच्या लाठ्या चुकून एसडीएमवरच (उपविभागीय दंडाधिकारी) पडल्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Patana IAS Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पोलीस चुकून एसडीएमवर लाठीचार्ज करताना दिसत आहे. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले बाकीचे सहकारी पोलीस लाठी मारणाऱ्याला त्यांची चूक लक्षात आणून देताना दिसत आहेत. आपल्यावर पोलिसाची लाठी पडल्यानंतर एसडीएमही संतप्त दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये, सिव्हिल ड्रोस घातलेले एसडीएम, गर्दी हटवण्याचा प्रयत्न करत असताना लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसाची लाठी त्यांच्यावरच पडते. यानंतर एसडीएम रागाने त्या पोलिसाला आपण कोण आहे हे निदर्शनास आणून देताना दिसत आहेत. यानंतर इतर पोलिसही आपल्या सहकाऱ्याला तिथून बाजूला करताना दिसत आहेत.

दलित आणि आदिवासींच्या हक्कांसाठी हानीकारक समजल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड आदिवासी ऑर्गनाझेशन्सनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यावर सोशल मीडिया युजर्सही भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT