Spider Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : मोरासारखे रंगीबेरंगी पंख पसरून नाचताना दिसला कोळी

सोशल मीडियावर कधी-कधी असे काही व्हिडिओ व्हायरल होतात. जे पाहून विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते.

सकाळ डिजिटल टीम

Spider Viral Video : सोशल मीडियावर कधी-कधी असे काही व्हिडिओ व्हायरल होतात. जे पाहून विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक कोळी दिसत आहे. इतर कोळींच्या तुलनेत हा कोळी आकाराने लहान आहे. झाडावर चालताना हा कोळी अचानक त्याच्या शरिरावरचे रंगीबेरंगी पिसं मोराप्रमाणे पिसारा फुलवून नाचताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ वाइल्ड अॅनिमलिया नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक सुंदर कोळी दिसत असून, या कोळीच्या डोक्यावर असलेली विशिष्ट रचना पाहून युजर्स थक्क झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कोळ्याच्या डोक्यावर मोराच्या पिसासारखा रंगीबेरंगी पंख आहेत. जे तो अगदी वेगळ्या पद्धतीने डोलवताना दिसत आहे.

सध्या कोळ्याचा हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडिओला सोशल मीडियावर एक लाख ४४ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाले आहेत. तर, दुसरीकडे अनेकजण यावर कमेट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati in Texas: अमेरिकेत दुमदुमला कसबा गणपतीचा जयघोष ; ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाकडून पुण्याच्या ग्रामदैवताची प्रतिष्ठापना

Viral Video : विमान हवेत असताना दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT