Ashadhi Wari mangalsutra snatching Viral Video esakal
Trending News

Viral Video : वारीत चोरीचा थरार! मंगळसूत्र हिसकावताना महिलेला रंगेहाथ पकडलं, VIDEO पाहून शॉक व्हाल..

Viral Video Ashadhi Wari mangalsutra snatching : आषाढी वारीच्या सोहळ्यात पुण्यात एक महिला मंगळसूत्र चोरी करताना रंगेहाथ पकडली गेली. परिवर्तन अॅकेडमीच्या तरुणांनी सतर्कता दाखवत तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Saisimran Ghashi

Ashadhi Wari Viral Video : वारकरी संप्रदायाचा अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा असा आषाढी वारी सोहळा सध्या पुण्यात मोठ्या उत्साहात सुरू आहे. संत तुकाराम महाराज (देहू) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) यांच्या पालख्या पुणे मुक्कामानंतर पंढरपूरच्या दिशेने रवाना होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. लाखो भाविक आणि वारकरींच्या जयघोषाने आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात सारा पुणे शहर भक्तिमय झाले असतानाच काही समाजकंटकांनी याला गालबोट लावायचा प्रयत्न केला

वारीमध्ये सहभागी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिने, पाकिटं आणि पिशव्या चोरण्याचा सपाटा लावला आहे. विशेषतः महिला भाविकांचा या टोळक्यांनी जास्त फटका बसवला आहे. यामध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे, कानातले, हातातील बांगड्या हिसकावण्याचे प्रकार समोर आले आहेत. दरवर्षी अशा घटना घडत असतानाही यंदा चक्क एका चोरट्या महिलेला मंगळसूत्र चोरताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

घटनास्थळावर उपस्थित असलेल्या परिवर्तन अॅकेडमीच्या काही तरुण-तरुणींनी ही महिला चोरट्याला वेळेवर पकडलं आणि तिचा प्रयत्न हाणून पाडत पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गर्दीच्या गडबडीत, सर्वजण पालखीचं दर्शन घेत असताना ही महिला अत्यंत चपळाईने एका वारकरी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, जागरूक तरुणांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळून लावण्यात यश आलं.

वारीसाठी पुणे शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी मार्गांवर ड्रोनद्वारे देखरेख, वाहतूक नियंत्रण, आरोग्य आणि आपत्कालीन सुविधा यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

पालखीतील महिलांचा वाढता सहभाग आणि त्यासोबत धोका

वारीमध्ये हजारो दिंड्या सहभागी होतात आणि त्यात महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणावर असते. भक्तीभावाने सहभागी झालेल्या माय माऊली, भगिनींच्या गर्दीचा फायदा घेत हे टोळके आपली कुरापत साधत आहेत. त्यामुळे भाविकांनी वारीत सहभागी होताना आपले मौल्यवान दागिने न घालणे, महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवणे आणि अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे आवश्यक आहे.

भाविकांसाठी पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. वारी ही केवळ श्रद्धेची गोष्ट नसून, समाजाच्या सुरक्षा आणि शिस्तीचीदेखील परीक्षा असते. त्यामुळे प्रत्येक भाविकाने जबाबदारीने वागून वारीचा खरा आनंद लुटावा, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT