सातसडा धबधब्यावर पावसामुळे पर्यटक अडकले.
ट्रेकर्सनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले.
व्हिडीओ व्हायरल होत सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.
Viral Video : पावसाळा म्हणजे निसर्गाचा जल्लोष. धबधबे, धुके, हिरवाई आणि थंडगार वारे... याच उत्साहात अनेक तरुण-तरुणी पर्यटनस्थळी गर्दी करत असतात. मात्र पावसाळ्यातील हा उत्साह काही वेळा जीवघेणा ठरू शकतो, हे नुकतंच घडलं एका व्हायरल व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध सत्सडा धबधब्यावर १० ते १५ तरुण अचानक वाढलेल्या पाण्यात अडकले त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचलेले हे तरुण धबधब्याच्या सौंदर्यात रमून गेले. व्हिडीओमध्ये दिसतं की, इतर काही पर्यटकांनी त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता, पण ते दुर्लक्षित करण्यात आलं. काही वेळातच पाण्याचा रंग बदलला आणि पावसाचा जोर वाढला. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही मिनिटांत पाण्याची पातळी खूप वाढली आणि हे तरुण एका छोट्या बेटासारख्या जागी अडकले.
या प्रसंगाने परिसरात एकच खळबळ उडाली. पावसाचा जोर आणि प्रवाह लक्षात घेता मदत पोहोचवणं अवघड होतं. मात्र काही अनुभवी ट्रेकर्सनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धाडसाने पुढाकार घेतला. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या तरुणांना बाहेर काढण्याचं ठरवलं.
पाण्याचा वेग, निसरडे खडक, आणि जोरदार प्रवाह यांना तोंड देत त्यांनी एकमेकांचे हात पकडून, साखळी तयार करत एक-एक जणांना सुरक्षित बाहेर काढलं. या संपूर्ण थरारक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो अनेकांनी शेअर करत ट्रेकर्सचं कौतुक केलं आहे.
व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या तरुणाने एक खंतही व्यक्त केली आहे "ज्यांचं प्राण वाचवले, त्यांनी साधं आभारसुद्धा मानलं नाही!" या बाबत सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. अनेकांनी ट्रेकर्सच्या माणुसकीचं आणि शौर्याचं कौतुक केलं, तर काहींनी बेफिकीर पर्यटकांवर टीका केली.
"छान काम केले दादा, माणुसकी अजूनही जिवंत आहे," अशी एका युजरची कमेंट होती. "काही लोक उपकाराची कदर करत नाहीत. पण देव तुमचं काम पाहतोय," अशा शब्दांत दुसऱ्याने ट्रेकर्सचं मनोबल वाढवलं.
हा प्रसंग फक्त मनोरंजनाचा भाग नसून सर्वांसाठी एक धडा आहे. निसर्गाच्या सानिध्यात जाताना काळजी घ्या. जलप्रवाह, हवामान यांचा अंदाज घेतल्याशिवाय धोकादायक ठिकाणी उतरणं टाळा.
सातसडा धबधब्यावर नेमकं काय घडलं?
सातसडा धबधब्यावर पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि १०-१५ लोक अडकले.
या तरुणांची सुटका कशी करण्यात आली?
काही अनुभवी ट्रेकर्सनी जीवाची बाजी लावत, खडकांचा आधार घेत सर्वांना एक एक करून सुरक्षित बाहेर काढलं.
या घटनेत कोणालाही इजा झाली का?
सुदैवाने, कोणालाही गंभीर इजा झाली नाही. सर्वजण सुखरूप आहेत.
पावसाळ्यात अशा ठिकाणी जाताना कोणत्या काळजी घ्याव्यात?
हवामानाचा अंदाज घ्या, पाण्याच्या प्रवाहाकडे लक्ष ठेवा, स्थानिक सल्ला पाळा आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.