shocking video woman beats little girl esakal
Trending News

Video : दगडाच्या काळजाची आई! चार वर्षांच्या चिमुकलीला उलथनं तुटेपर्यंत मारहाण, नरड्यावर पाय देऊन उभी राहिली; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

shocking video woman beats little girl : एका महिलेचा लहान मुलीवर अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Saisimran Ghashi
  • एका महिलेने लहान मुलीला अमानुषपणे मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत असून कायदेशीर कारवाईची मागणी सुरू आहे.

  • प्रशासन आणि बालहक्क आयोगाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने चार वर्षांच्या लहान मुलीला अत्यंत अमानुषपणे मारहाण करताना दिसते. या घटनेने समाजमन हादरून गेले असून संबंधित महिलेविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक महिला एका चिमुकल्या मुलीला बेदम मारहाण करत आहे. ती महिला या लहान मुलीला उलातण्याने मारते, तिच्या गळ्यावर पाय देते. तिला फरफटत बाहेर घेऊन जाते आणि पुन्हा मारहाण करते. यामध्ये चक्क ते उलातणे तुटते. ही घटना पाहणाऱ्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकणारी आहे. मारहाण करताना महिलेच्या चेहऱ्यावर कोणतीही दया किंवा अपराधगंड जाणवत नाही, उलट ती पूर्ण रागाच्या भरात निर्दयतेने मुलीला चापट मारताना दिसते.

व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट अधिक चिंताजनक आहे ही घटना घरातच घडत असून, आजूबाजूला एक व्यक्ति त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे येत असतानाही ती महिला त्या व्यक्तीला बाजूला सारून चिमूकलीला एका हातात उचलून फरफटत नेते.

या प्रकरणी संबंधित प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी तत्काळ लक्ष घालण्याची गरज असून सोशल मीडियावर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. "अशा महिलेला कठोर शिक्षा झाली पाहिजे,", "चिमुकलीचा गुन्हा तरी काय?", अशा अनेक प्रतिक्रियांनी सोशल मीडियाचे पान भरून गेले आहे.

तथ्यांची खात्री झाल्यानंतर संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बालहक्क संरक्षण आयोगाकडून सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपूर्ण समाजाला हादरवणाऱ्या या घटनेमुळे एक मोठा प्रश्न समोर येतो आपल्या घरात, आजूबाजूच्या समाजात अशी क्रूरता घडत असताना आपण डोळेझाक करतो का?

अशा प्रकारांवर वेळीच अंकुश लावण्यासाठी समाजाने आणि यंत्रणांनी एकत्र येऊन कठोर पावले उचलण्याची ही वेळ आहे. दरम्यान, व्हिडिओ कुठला आहे, घटना कोणत्या भागात घडली आणि त्या मुलीची प्रकृती कशी आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

FAQs

1. हा व्हिडिओ कुठे घडलेला आहे?
सध्यातरी या घटनेचे स्थान निश्चित झालेले नाही, तपास सुरु आहे.

2. मुलीची प्रकृती कशी आहे?
व्हिडिओनंतर मुलीची स्थिती स्पष्ट नाही, अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे.

3. या महिलेवर कोणती कारवाई होऊ शकते?
बालहक्क कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद आहे, पोलिस चौकशीची अपेक्षा आहे.

4. समाजाने अशा घटनांवर काय भूमिका घ्यावी?
अशा प्रकारांबाबत त्वरित तक्रार करणे आणि संबंधित यंत्रणांना माहिती देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Hit-and-Run Case: नाशिकमध्ये पुण्यातील ‘पोर्श’सारखा थरार! CCTV मध्ये भीषण हिट अँड रन कैद; बड्या बापाचा अल्पवयीन मुलगा ताब्यात

Latest Marathi News Live Update : मुलुंड पूर्व द्रुतगती मार्गावर तरुणांकडून धोकादायक स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून शोध सुरू

नवीन ट्विस्ट! पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच उलटणार; बांगलादेaश T20 World Cup मध्ये परतणार, जय शाह करेक्ट कार्यक्रम करणार

ठाणे, रायगड, नंदुरबारला अवकाळी पावसाने झोडपलं; राज्यात ढगाळ वातावरण, आंब्यासह रब्बी हंगामातील पिकं धोक्यात

१९ वर्षांपूर्वी सुरू झालेली चर्चा, आता निर्णय; भारत EU व्यापारी करारावर आज होणार शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT