What is Black Magic 
Trending News

What is Black Magic: मालदिवच्या राष्ट्रपतींवर केली गेलेली काळी जादू नेमकी आहे तरी काय?

दोन दिवसांपूर्वी, मालदीवच्या अध्यक्षांवर काळी जादू केल्याची धक्कादायक बातमी समोर आली

सकाळ डिजिटल टीम

सध्या जग आधुनिकतेच्या शिखरावर पोहचले आहे. बहुतांश लोक देशविदेशात जाऊन विविध विषयांचा अभ्यास करताना दिसत आहेत. असे असले तरी आजही अनेक लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत. अनेक लोक सध्याच्या या आधुनिक जगातही काळी जादू सारख्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहेत. याचा प्रत्यय अनेक घटनांमधून पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी, मालदीवच्या अध्यक्षांवर काळी जादू केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या प्रकरणी मालदीव पोलिसांनी देशातील एका मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. मालदीवमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पर्यावरण राज्यमंत्री फातिमा शमानाझसह अन्य दोन जणांना मुइझ्झूच्या जवळ जाण्यासाठी जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेनंतर जगभर काळ्या जादूची जोरदार चर्चा रंगली. तर जाणून घेऊया काळ्या जादूबद्दल...

काळी जादू म्हणजे काय?

काळी जादू म्हणजे एक अशी कला किंवा विद्या ज्याद्वारे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नुकसान पोहोचवू शकते, असे मानले जाते. फक्त भारतातच नाहीतर जगभरात काळी जादू प्रचलित आहे. भारतासह संपूर्ण जगात असे अनेक तांत्रिक आहेत जे या विद्याचा वापर करतात. मात्र, काळी जादू उघडपणे करत नाहीत. सर्वांच्या छुप्या पद्धतीने ही काळी जादू केली जाते. भूतबाधा, वशिकरण आणि अशा अनेक गोष्टी या काळ्या जादूमध्ये येतात.

तसेज, काळी जादू ही एक गुप्त कला आहे जी सहसा एखाद्याला वश करण्यासाठी किंवा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी वापरली जाते. असे म्हणातात की, ज्या व्यक्तीवर काळी जादू केली जाते ती व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण गमावून बसतो.

त्याचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक जीवनावर परिणाम होतो. ज्या व्यक्तीवर काळ्या जादूचा प्रभाव पडतो त्याच्या जीवनात त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा तो मानसिक संतुलनही गमावून बसतो आणि काही विचित्र गोष्टी करू लागतो.

बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की काळी जादू खरी आहे तर काही लोक असे मानतात की, या सर्व काल्पनिक गोष्टी आहे. विज्ञानानुसार, काळी जादू ही एकमेव ऊर्जा आहे ज्याचा सकारात्मक आणि नकारात्मक वापर केला जाऊ शकतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT