Viral Video Sakal
Trending News

Student Viral Speech : तुला भाषण कुणी दिलं लिहून? मुलाने दिलं मास्तरचं नाव सांगून!

सकाळ डिजिटल टीम

प्रजासत्ता दिनाच्या दिवशी शाळेतील एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शाळेतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात विनोदी भाषण करत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. "आजपासून भारतात लोकशाही लागू झाली, लोकशाहीमध्ये काहीही करू शकतो. लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो" अशा भाषणामुळे त्याने अनेकांची मने जिंकली होती. पण या मुलाला भाषण नेमकं कुणी लिहून दिलं?

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चिमुकल्याचं नाव कार्तिक वजीर असं असून तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असल्याची माहिती आहे. या शाळेतील तो पहिलीचा विद्यार्थी असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरची परिस्थितीही बिकट असून तो लहानपणापासून खोडकर असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कार्तिक या विद्यार्थ्याला रातांधळेपणा हा आजार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. तर त्यामुळे त्याला कमी दिसते असं सांगण्यात येत आहे. तर त्याला त्यावरून शाळेतील मुलं चिडवतातही अशी माहिती आहे.

कार्तिकने भाषणात नेमकं काय म्हटलं होतं?

"लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो, माकडासारखा झाडावर चढतो तर लोकशाही असल्यामुळे मला माझे वडील काहीच बोलत नाहीत. पण काही मुलं माझं नाव शाळेतील सरांना सांगतात आणि काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात. पण मी खूप गरिब आहे, माझ्याएवढा गरिब अख्ख्या तालुक्यात कुणीच नसेल" अशा शब्दांत भाषण करत त्याने अक्षरश: प्रेक्षकांची मने जिंकली.

शिक्षकाने लिहून दिलं होतं भाषण

त्याच्या शिक्षकानेच त्याला भाषण लिहून दिल्याची माहिती कार्तिक याने दिली. भारत मस्के असं त्याच्या शिक्षकाचं नाव असून त्यांनी कार्तिकच्या बहिणीकडून त्याच्या भाषणाची तयारी करून घेतल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT