Viral Video Sakal
Trending News

तरुणीला आई बनण्याची संधी देणाऱ्याला मिळणार 2BHK फ्लॅट, कार अन् 30 लाख'; नेमकं काय आहे प्रकरण?

या तरूणीने व्हिडिओच्या माध्यमातून तरूणांना आवाहन केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एका तरूणीला जो तरूण आई बनवण्याची संधी देईल त्याला २ बीएचके घर, एक गाडी आणि ३० लाखांचे बक्षिस मिळणार आहे असं सांगत एका तरूणीने तरूणांना आवाहन केलं आहे. या तरूणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ ट्वीटरवर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या तरूणीने आपल्या अटी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे एखाद्या तरूणाचे लग्न झाले असले तरी या तरूणीला तो मुलगा चालणार आहे आणि ती या तरूणासोबत फक्त आई होईपर्यंतच राहणार असून लग्न करणार नसल्याचं तिने सांगितलं आहे.

काय आहेत तरूणीच्या अटी?

"जो मुलगा मला आई बनण्याची संधी देईल त्याला मी २ बीएचके घर, गाडी आणि २५ ते ३० लाख रूपयांची कॅश देईल, त्याचबरोबर मुलगा दिसायला चांगला असला पाहिजे, जाती धर्माची कोणतीही अट असणार नाही, त्याचं वय ३० ते ३५ च्या दरम्यान असलं पाहिजे. तो लग्न झालेला असला तरी चालेल पण त्याच्या कुटुंबाची त्याच्याकडे परवानगी असली पाहिजे."

"मी त्याच्यासोबत लग्न करणार नाही, फक्त त्याने मला आई बनण्याची संधी दिली पाहिजे, जो मुलगा तयार असेल त्याला आम्ही सुरूवातील अर्धे पैसे देणार आहोत. मुलगा शिकलेला नसला तरी चालेल पण त्याने चांगल्या गप्पा मारल्या पाहिजेत." अशा अटी या तरूणीने मांडल्या आहेत.

या तरूणीने व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा संपर्क दिलेला नाही. यासंदर्भाती कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. म्हणून हा व्हिडिओ खरा आहे की खोटा यासंदर्भात "सकाळ माध्यम" पुष्टी करत नाही.

पण अशा ऑफर कधीकधी फसव्या असू शकतात, जाळ्यात ओढून आपली फसवणूक केली जाऊ शकते. अनोळखी तरूणींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून तरूणांना जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत.

त्याचबरोबर आपले नग्न फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात त्यामुळे या गोष्टी प्रत्येक तरूणांच्या लक्षात असल्या पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT