Bhopal Crime News Sakal
Trending News

Crime : फोन हिसकावून घेतल्याचा राग; बायकोने झोपलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं उकळतं तेल

Bhopal Crime News: फोन घेतला हिसकावून घेतल्याच्या रागातून बायकोने झोपलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं उकळतं तेल

सकाळ डिजिटल टीम

Bhopal Crime News: मध्यप्रदेशमधील ग्वालियर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका पत्नीने आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं तेल ओतलं आहे. या घटनानंतर आरोपी पत्नी घटनास्थळावरून फरार झाली असून जखमी झालेल्या पतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अधिक माहितीनुसार, ग्वालियर शहरातील कंपू स्टेशन भागामध्ये राहणारा सुनील धाकड खासगी नोकरी करतो. तर तो आपली पत्नी भावना हिच्यासोबत येथे राहतो. एके दिवशी एका शेजारी महिलेने सांगितलं की, तुम्ही कामावर गेल्यावर तुमची पत्नी माझ्या पतीसोबत बोलते. यानंतर सुनीलने त्याच्या पत्नीला समजावलं होतं पण तिने पतीचं ऐकलं नाही.

एके दिवशी सुनील कामावरून घरी आला असता पत्नी भावना शेजारच्या महिलेच्या पतीसोबत फोनवर गप्पा मारताना त्याला दिसली. यानंतर सुनीलने भावनाकडील मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल हिसकावल्यानंतर ती नाराज झाली आणि निघून गेली. रात्री सुनील झोपेत असताना ती आली आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं तेल ओतलं.

दरम्यान, तेल एवढं गरम होतं की यामध्ये सुनील चांगलाच भाजला. पण तेल ओतल्यानंतर पत्नी फरार झाली. सुनीलने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी सुनीलला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT