Crime  Sakal
Trending News

Crime : बर्थडेच्या दिवशी नवऱ्याच्या रूममध्ये दुसरीच मुलगी; 2 लेकरांसहित पत्नीची आत्महत्या

या घटनेने सोन्यासारख्या लेकरांसहित कुटुंब उध्वस्त झालं आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दत्ता लवांडे

जयपूर : राजस्थानातील जोधपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका महिलेने आल्या दोन मुलांसोबत आत्महत्या केली आहे. आपला नवरा दुसऱ्या एका महिलेसोबत एका रूममध्ये आढळल्याने या पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले असून आपल्या दोन्ही मुलांना सुद्धा संपवलं आहे.

अधिक माहितीनुसार, राजस्थानातील जोधपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. गावाला राहत असलेली पत्नी नवऱ्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली असता तिचा पती एका मुलीसोबत बंद रूममध्ये आढळला. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि दोन्ही मुलांना घेऊन तिथून निघून गेली. या घटनेचा राग मनात धरून या महिलेने आपलं जीवन संपवलं आहे.

तर नवऱ्याच्या आणि बायकोच्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. बिरमा असं मृत महिलेचं नाव असून सुरेश विश्नोई असं नवऱ्याचं नाव आहे. त्याचबरोबर बिरमा हिच्यासोबत कार्तिक (वय-५) आणि विशाल (वय-३) या मुलांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने हे कुटुंब उध्वस्त झालं आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सदर पत्नी आपल्या नवऱ्याला भांडताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये एक तोकड्या कपड्यातील मुलगीही दिसत आहे. "तू माझा फोन उचलत नाही पण या मुलीसोबत इथे बंद रूममध्ये कसा?" असं ती त्याला बोलताना दिसत आहे. तर यामध्ये महिलेचा पती तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहे.

आपला पती दुसऱ्या मुलीसोबत आढळल्याचा प्रकार पत्नीच्या पचनी पडला नाही. तिने रडत रडत आपल्या दोन लहान मुलांना घेऊन थेट रेल्वेखाली उडी मारली आणि आत्महत्या केली. याबद्दल पोलिसांनी फरार असलेल्या पती सुरेश आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलीचा तपास सुरू केला आहे. त्यांना अटक करून चौकशी केल्यानंतर प्रकरणाचा तपास लागेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT