delhi arvind kejriwal topple the government operation lotus bjp Liquor policy Arvind Kejriwal Latest Marathi News
Trending News

Viral Video : मफलर कुठं गेलं? महिलेच्या प्रश्नाला केजरीवालांचं उत्तर, म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या पक्षाच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान गुजरातबरोबरच दिल्लीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ते सातत्याने लोकांना भेटत आहेत. याच भागात त्यांनी बुधवारी दिल्लीत पदयात्रा केली. यादरम्यान ते एका रस्त्यावर पोहोचले असता त्यांच्या समर्थकांनी त्यांना घेराव घातला.

एका महिला कार्यकर्त्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या गायब असलेल्या मफलरबद्दल प्रश्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अरविंद केजरीवाल त्यांच्या मफलरमुळे चर्चेत आले होते. थंडी पडताच मफलर आपल्या गळ्यात ते मफलर अडकवून ते फीरताना दिसत. मात्रा आता हे मफलर गायब झालं आहे.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

दिल्लीतील आगामी महापालिका निवडणुकीबाबत मुख्यमंत्री युद्धपातळीवर प्रचार करत आहेत. याच क्रमाने बुधवारी ते एका भागात पोहोचले, तिथे त्यांनी एका महिला कर्मचाऱ्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा महिलेने त्याला विचारले की तुम्ही मफलर का घालतलं नाहीत? यावर अरविंद केजरीवाल हसत हसत म्हणाले की, अजून थंडी नाही, म्हणून घातलं नाही. यानंतर त्यांनी लोकांसोबत सेल्फी घेतला आणि नंतर प्रचारासाठी पुढे निघाले.

पक्षाने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडिओ

महिला आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संभाषण आम आदमी पार्टीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे, जो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी गंमतीने असा दावाही केला होता की सीबीआयने त्यांच्या घराची झडती घेतली तर त्यांना फक्त मफलर सापडेल, बाकी काही नाही. मात्र, केजरीवाल यांना त्यांच्या गायब झालेल्या मफलरबद्दल विचारण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधी देखील त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दिल्ली महानगरपालिकेत 250 वॉर्ड आहेत आणि त्यासाठी 4 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत आप, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT