Viral Video Sakal
Trending News

Viral Video : शेवटी आईच ती! पिल्लांना खायला दिल्याचं मानलं असं आभार; व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आई ही शेवटी आईच असते. आईची जागा जगातील कोणतीच व्यक्ती घेऊ शकत नाही. ती आपल्या लेकरांना किंवा तिच्या पिल्लांना वाढवण्यासाठी ती काहीही करू शकते. आपल्या पोटाला चिमटा काढून प्रत्येक आई लेकरांना खाऊ घालत असते. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कुत्र्याच्या पिल्लाला अन्न खाऊ घालत आहे. तर हे पाहून त्या पिल्लांची आई भावनिक होते आणि महिलेच्या हातात पुढचा पाय देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर या महिलेने कुत्र्याला कुरवाळलं आहे. पण आपल्या पिल्लांना एका व्यक्तीने खायला दिल्याचं समाधान त्या आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

दरम्यान, "ही पण एक आईच आहे, तिला पण आपल्या पिल्लांची काळजी असते. ती आपल्या पिल्लांसाठी काहीपण करू शकते" अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून आपलेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

SCROLL FOR NEXT