chef pillai sakal
Trending News

Inspiring Story: कधी वेटर तर कधी मंदिराबाहेर शेंगदाणे विकले...मेहनत केली अन् आता आहे सेलिब्रिटी

आज ते आपल्या मेहनतीने मोठे व्यापारी बनले आहे. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Aishwarya Musale

ज्या व्यक्तीने लहानपणी झाडांवरची फळे तोडून विकली, मंदिराबाहेर शेंगदाणे विकले, वेटर म्हणूनही काम केले... आज ते आपल्या मेहनतीने मोठे व्यापारी बनले आहे. त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांचे नाव देशात आणि जगात आहे. अलीकडेच त्यांनी त्यांची प्रेरणादायी गोष्ट शेअर केली आहे.

खरं तर आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध शेफ आणि उद्योजक सुरेश पिल्लई यांच्याबद्दल. ४५ वर्षांचे सुरेश रेस्टॉरंट चेन रेस्टॉरंट शेफ पिल्लईचे संस्थापक आहेत. बंगळुरु, कोची, कतार, दुबई इत्यादी ठिकाणी त्यांची रेस्टॉरंट्स उघडली आहेत. हळूहळू ही संख्या वाढत आहे. केरळमधील उत्तमोत्तम खाद्यपदार्थांची चव लोकांपर्यंत नेण्यासाठी ते जगभर ओळखले जातात.

केरळमध्ये जन्मलेल्या सुरेश यांनी 29 मे रोजी ट्विटरवर स्वत:चे एक फोटो पोस्ट केले, ज्यात ते एका केटरिंग सर्व्हिस बॉयपासून येथे कसे पोहोचले हे स्पष्ट केले. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले - एका अनोळखी लग्न समारंभात जेवण सर्व्ह करताना, हा 18 वर्षांचा केटरिंग सर्व्हिस बॉय तोच शेफ पिल्लई आहे ज्याला तुम्ही आज ओळखता.

सुरेश पिल्लई पुढे लिहितात- मी सहावी किंवा सातव्या वर्गात माझा पहिला 'व्यवसाय' सुरू केला. आमच्या घरात एक मोठे कांबिली नारंगचे झाड होते. मला ते इतकं आवडायचं की मी सकाळी ५ वाजता उठायचो आणि नाश्त्याच्या वेळी एक-दोन तोडायचो. लवकरच तो माझ्या खिशातील पैशाचा पहिला स्रोत बनला. फळे तोडल्यानंतर 25 पैसे प्रति नग किंवा एक रुपयाला 4-5 नग या दराने बाजारात विकायचो.

यानंतर सुरेश त्यांच्या दुसऱ्या 'व्यवसाय'बद्दल सांगतात, जो केरळमधील कोल्लम शहरातील मंदिराबाहेर शेंगदाणे विकून सुरू झाला. ते म्हणाले- एक व्यापारी असल्याने माझी दुसरी टर्म मंदिराच्या उत्सवासाठी शेंगदाणे विकण्याची होती. विशेषतः, भाजलेले शेंगदाणे. ते सुमारे 2 ते 3 किलो कच्चा शेंगदाणे खरेदी करायचे, नंतर भाजायचे आणि एक रुपयाला विकायचे.

सुरेश- माझ्या किशोरवयात मी हॉटेलचा वेटर होतो. एका मंदिराच्या रेस्टॉरंटमध्ये क्लिनर म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी केटरिंग बॉय म्हणूनही काम केले. आज मी जे काही आहे ते मला माझ्या भूतकाळातील अनुभवातून मिळाले आहे.

शेफ सुरेश पिल्लई यांचे हे प्रेरणादायी ट्विट सध्या व्हायरल होत आहे. वापरकर्ते त्यांच्या संघर्षाचे कौतुक करत आहेत. सुरेश यांनी बीबीसी मास्टरशेफ प्रोफेशनल्समध्ये देखील भाग घेतला आहे. ते एक प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना 7 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT