World Earth Day 2023 esakal
Trending News

World Earth Day 2023 : तुमच्यासहीत मुलांचंही भविष्य वाचवा, या इकोफ्रेंडली वस्तू वापरा

केवळ आजच्याच दिवशी नाही तर आयुष्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही इको फ्रेंडली वस्तू वापरायला हव्यात

सकाळ डिजिटल टीम

World Earth Day : हवामानातील बदल हे नैसर्गिक असतात असं मत आता काहीसं बदलत चाललेलं दिसतंय कारण ऋतूनुसार हल्ली हवामान बदलताना होताना दिसत नाही. तर मानवनिर्मित प्रदूषणाचा गंभीर परिणाम आपल्याला हवामानातील बदलांतून दिसून येते. अगदी भर उन्हाळ्यात पाऊस पडणे, गारांचा पाऊस पडणे हे सगळे पृथ्वीवरील प्रदूषणामुळे होणारे गंभीर परिणाम आहेत. आज जागतिक वसुंधरा दिवस आहे. तेव्हा केवळ आजच्याच दिवशी नाही तर आयुष्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही इको फ्रेंडली वस्तू वापरायला हव्यात. चला तर जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की 2016 आणि 2020 दरम्यान इको-फ्रेंडली उत्पादनांच्या शोधात 71% वाढ झाली आहे. आणि Shopify च्या फ्यूचर ऑफ कॉमर्स अहवालात असे आढळून आले आहे की 44% ग्राहकांनी अशा ब्रँडमधून खरेदी करायला सुरुवात केली आहे जे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांना अशा वस्तूंची विशेष आवड असते.

इको फ्रेंडली प्रोडक्ट्स म्हणजे काय?

इको-फ्रेंडली उत्पादने अशी उत्पादने आहेत त्यांचे उत्पादन, पॅकेजिंग, वितरण, वापर आणि विल्हेवाट पर्यावरणावर कसा परिणाम करतात यासाठी स्ट्रिक्ट स्टँडर्ड असतात. इको-फ्रेंडली उत्पादनांच्या पॅकेजिंगवर इकोलाबेल चिन्ह असते जे त्याच्या टिकाऊपणाचा पुरावा देते.

हे इको-फ्रेंडली प्रोडक्ट्स वापरत पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवण्यास सहकार्य करा

१. कुल्हड

चहा, कॉफी, दूध पिण्यासाठी जे कप तु्म्ही विकत घेता ते घेताना ते कृपया प्लास्टिकचे नसावे हे लक्षात घ्या. प्लास्टिकचे विघटन वर्षोवर्ष होत नसल्याने पृथ्वीवरील पर्यावरणाला त्याने धोका होतो. तेव्हा मातीचे कप किंवा कुल्हड वापरणे कधीही उत्तम. मातीचे कुल्हड वापरत तुम्ही एकप्रकारे पृथ्वीचे संरक्षणच करत आहात.

२. दातून

प्लास्टिकचे ब्रश वापरण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक दातून वापरू शकता. तसेच बाजारात इकोफ्रेंडली ब्रशसुद्धा आहेत. त्याचा वापर करून तुम्ही प्लास्टिकचा वापर टाळू शकता.

३. जमेल तेव्हा केळीच्या ताटात जेवणे

केळीच्या ताटात जेवणे तसे तर आरोग्यदायी मानले जाते. यात असलेले पोषक तत्व तुमच्या जेवणाद्वारे तुमच्या पोटातही जातात. (Earth)

४. कापडाच्या बॅग्ज

हल्ली प्लास्टिकच्या बॅग्जवर बंदी आली असली तर बरेच लोक प्लास्टिकच्या बॅग्ज यूज करतात. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने ते फार घातक आहे. तेव्हा कापडाच्या बॅग्ज तुम्ही शिवून घेतल्या किंवा विकत घेतल्या की त्या दीर्घकाळ टिकतात आणि तुम्ही वारंवार त्याचा वापर करू शकता.

५. नारळाच्या झाडाचा झाडू

आधीच्या काळी बहुतांश लोकांच्या घरी नारळाच्या झाडांपासून बनवलेल्या झाडूचा वापर केला जात असे. मात्र आता तो फारसा वापरात दिसत नाही. मात्र हा झाडू पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे.याचा वापर करायला हवा.

६. घरी बसण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्च्यांचा वापर करण्याऐवजी वेताचा स्टूल किंवा खुर्च्या वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT