A viral video shows a truck disappearing on a dangerous road, reminiscent of the 'Gir Gardan Ghat' scene from Khatta Meetha. ESAKAL
Trending News

Funny Viral Video: सापडला गिरगर्धन घाट ! ट्रक आला की होतो गायब, पहा जगातला सगळ्यात अवघड मार्ग 

Netizens Compare Dangerous Road to Iconic Movie Scene from Khatta Meetha: अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला नेटकरी गिरगर्धन घाटाशी तुलना करू लागले आहेत. या व्हिडिओत एक ट्रक अत्यंत अवघड आणि धोकादायक मार्गावरून जाताना दाखवला आहे.

Sandip Kapde

चित्रपटाच्या जगात काही प्रसंग आणि दृश्ये अशी असतात, जी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडतात. 'खट्टा मीठा' या चित्रपटातील एक सीन आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला आहे. या चित्रपटात राजपाल यादव आणि जॉनी लीवर यांनी अप्रतिम कॉमेडी केली आहे, ज्यामध्ये गिरगर्धन घाटाचा उल्लेख आहे.

गिरगर्धन घाट, हा एक असा घाट आहे, जिथं रस्ता असला तरी तिथे चालणाऱ्यांना मान वर करून चालावे लागते, म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर, रस्त्यावर चालताना लोकांना इतका धोका असतो की ते जणू पॅराशूट घेऊनच चालतात. हे दृश्य चित्रपटातील रोडरोलर इंजिनिअर 'अव्हाड' अंशुमनने (जॉनी लीवर) सांगितले आहे.

गिरगर्धन घाटाचं वर्णन करण्यासाठी जॉनी लीवरचा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. या दृश्यात जॉनी लीवरने राजपाल यादवला सांगितलं होतं की, "हा घाट इतका अवघड आहे की, इथं गाडी चालवणं म्हणजे जणू मृत्यूला बोलावणं देण्यासारखं आहे. या घाटावर गाडी चालवायला जावं तर रस्ता गायब होतो."

या दृश्यातली राजपाल यादव आणि जॉनी लीवर यांची केमिस्ट्री खूपच कमाल होती, आणि प्रेक्षकांनी या दृश्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. कितीही वेळा हा सीन पाहिला तरी तो बोरिंग वाटत नाही.

दरम्यान, अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला नेटकरी गिरगर्धन घाटाशी तुलना करू लागले आहेत. या व्हिडिओत एक ट्रक अत्यंत अवघड आणि धोकादायक मार्गावरून जाताना दाखवला आहे. ट्रक चालकाने रस्त्यावरून ट्रक रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो काही क्षणांसाठी गायब झाल्यासारखा वाटला, आणि नेटकऱ्यांनी या दृश्याची तुलना थेट गिरगर्धन घाटाशी केली.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काही लोकांनी म्हटलं आहे की, "या घाटावरून गाडी चालवण्यासाठी फक्त 'अवॉर्ड' अंशुमान (जॉनी लीवर) सारखा माणूसच पाहिजे." काहींनी तर म्हटलं, "हा ट्रक ड्रायव्हर आपल्या इंजिनिअरिंगमध्ये उत्तीर्ण झालेला दिसतो, कारण अशा घाटावर गाडी चालवणं म्हणजे जीवावर उदार होणं."

व्हायरल व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक गाड्या एक उंचावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्या आपोआप रिव्हस जातात. एकूण सात गाड्या रिव्हस होत आहेत, आणि काही गाड्यांच्या चालकांनी तर गाडीतून उड्या मारल्या आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही, पण हा पाहून नेटकऱ्यांना गिरगर्धन घाट आठवला आहे. त्या घाटात एक रोड रोलर देखील आहे, पण त्याने चढण्याची हिमत केली नाही.

गिरगर्धन घाटाचा उल्लेख जिथं तिथं केला जातोय, तेव्हा या दृश्याने 'खट्टा मीठा' चित्रपटाच्या चाहत्यांना पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये नेलं आहे. हा प्रसंग जितका मनोरंजक होता तितकाच तो खूप काही शिकवून जाणारा होता.

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल होत असताना, काही जणांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्या घाटाच्या अवघड मार्गाचं वर्णन केलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी खट्टा मीठा चित्रपटाचा तो प्रसंग पुन्हा पाहायला सुरुवात केली आहे.

जगभरातील अवघड रस्ते आणि घाटांमध्ये गिरगर्धन घाटाचं नावही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा चर्चेत आलं आहे. या दृश्यातूनही एक गोष्ट स्पष्ट होते की, चित्रपटांतील कॉमेडी दृश्ये कधी कधी कितीही वर्षानंतरही प्रेक्षकांना हसवण्याचं सामर्थ्य राखून ठेवतात.

तर, या व्हिडिओनं तुम्हाला गिरगर्धन घाटाची आठवण करून दिली का? व्हिडिओ पाहा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

SCROLL FOR NEXT