Yogi Adityanath Sakal
Trending News

'स्वत:ला योगी म्हणवता पण योगा करता येईना'; 'त्या' व्हिडिओवरून योगी आदित्यनाथ ट्रोल | Viral Video

योगीजींचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायम चर्चेत असतात. त्यांचे वक्तव्य आणि एखाद्या प्रकरणात केलेली थेट कारवाई देशात चर्चेचा विषय ठरतो. पण सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

त्यामध्ये ते योगा करताना दिसत असून त्यांच्या पाठीमागे अनेक लोकांची गर्दी असून लोकंही योगासने करत आहेत. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी योगींना चांगलंच ट्रोल केलं आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा योगा दिनाचा आहे. योगा-डे च्या दिवशी सर्वजण योगासने करत असतात. तर योगाबद्दल जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्याप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा योगा केला पण एका क्षणाला त्यांना एका पायावर उभे राहण्यासाठी बराच प्रयत्न करावा लगाला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, एका पायावर उभे राहिल्यानंतर त्यांचा पाय परत खाली गेला आणि त्यांची चलबिचल झाली हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा ९ सेकंदाचा व्हिडिओ नेटकऱ्यांनी ट्वीटरवर शेअर केला असून त्यावर योगी आदित्यनाथ यांना ट्रोल केलं आहे.

"स्वत:ला योगी म्हणवता पण योगा करता येत नाही" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT