Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : शून्य मिनीटात मिळालं कर्माचं फळ! धावत्या बैलाला जोरात फटका मारला पण...

सकाळ डिजिटल टीम

जगात काही लोकं असे असतात, त्यांना दुसऱ्याच्या कामात अडथळा आणल्याशिवाय राहावत नाही, तर अनेकजणांना वाईट कामाचं फळ मिळत असतं. सध्या एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याने एका बैलाच्या धावण्याच्या स्पर्धेतील बैलाला जोराचा फटका मारल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ गावातील एका बैलाच्या धावण्याच्या स्पर्धेचा आहे. बैल जोरात धावत असताना एक तरूण मुलगा बैलाला जोराचा फटका मारत आहे. जोराचा फटका मारल्यानंतर या बैलाची दोरी या मुलाच्या पायात अडकते आणि हा मुलगा उडून खाली पडतो. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याने केलेल्या कर्माचं शून्य मिनीटात फळ त्याला मिळालं आहे. तर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT