Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : गाण्याचे बोल ऐकले अन् डान्स करतानाच तरूण ढसाढसा रडला; प्रेयसीने दिला होता धोका

हा तरूण लोळू लोळू रडत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपण एखाद्यावर प्रेम केलं की ते शेवटपर्यंत जावं यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण अनेकदा नात्यामध्ये काहीतरी अडचण येते आणि मनात नसतानाही नाते तुटतात. काही नात्यामध्ये एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला धोका देतो, त्यामुळे दुसऱ्या जोडीदाराला त्याचा त्रास सहन करावा लागतो.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण मुलगा आपल्या प्रेयसीच्या आठवणीत ढसाढसा रडत आहे. एका लग्नाची वरात सुरू असताना गाण्याच्या बोलावर सगळे डान्स करत असताना हा तरूण भावनिक झाला आणि तिच्या आठवणीत रडू लागला.

तो छातीही बडवून घेताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर जमिनीवर लोळू लोळू तो रडत आहे. यावेळी त्याचे कपडे मातीने माखलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या जोडीदाराची आठवण येईल.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ

Gautala Sanctuary: गौताळा अभयारण्यात निसर्गाचा मनमोहक जल्लोष! सीताखोरी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Hadapsar Traffic: अवघ्या 500 मीटरसाठी 30 मिनिटे! महंमदवाडी–उंड्री रस्त्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT