सापाचे नाव काढले तरी आपल्या अंगावर काटा येतो. तर प्रत्यक्षात साप बघितल्यावर काय परिस्थिती होईल. आपल्याला सापाची एवढी भिती वाटते पण एखाद्याने साप हातात पकडून जिवंत चावून खाल्ला तर? आपल्याला सुरूवातील विश्वास बसणार नाही पण हो. हे खरं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक युवक गाडीवर बसला आहे. तर तो रागाने त्याला चावा घेत खाताना दिसत आहे. त्याच्या हातात असलेला साप जिवंत आहे. तो तरफड करताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून मध्येमध्ये फणा काढल्याचंही आपल्याला दिसतंय. हा प्रकार पाहण्यासाठी अनेकजण उपस्थित असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. या तरूणाचं धाडस पाहून आपल्यालाही धक्का बसेल. हा व्हिडिओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर युजर्सने आपल्या मजेशीर कमेंट या व्हिडिओवर केल्या आहेत. शेअरचॅटवर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.