Video sakal
Trending News

एवढी मस्ती कशाला पाहिजे? हात सोडून तरूणाचा धावत्या ट्रेनमध्ये जीवघेणा स्टंट; थरारक Video

तरूणाची स्टंटबाजी जीवावर बेतू शकते

सकाळ डिजिटल टीम

चालत्या ट्रेनमधून पडून अनेकांचे जीव गेल्याचे प्रकार आपण अनेकदा पाहिले असतील किंवा धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करणारे तरूणसुद्धा आपल्या निदर्शनास आले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण धावत्या लोकलमध्ये जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकलमधील असल्याचं बोललं जात आहे. ट्रेनच्या दारात असलेल्या लोखंडी रॉडला धरून हा तरूण एक हात खाली सोडून खाली लटकताना दिसत आहे. रात्रीच्या वेळेसचा हा प्रकार दुसऱ्या एका प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसल्या शिवाय राहणार नाही.

दरम्यान, या तरूणाचा हात सुटला असता तर या तरूणाला जीव गमवावा लागला असता. धावत्या ट्रेनमधून पडल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता खूप कमी असते म्हणून असे स्टंट करणे चुकीचे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून असे जीवावर बेतणारे स्टंट तरूण का करत असतील असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT