Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : दोन वेळच्या भाकरीसाठीचं कष्ट; डोक्यावर पावाची लादी अन् सायकलवर...

सकाळ डिजिटल टीम

जगात अनेकांनी दोन वेळच्या जेवनासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हातावर पोट असलेले अनेक लोकं पाहिले असतील. अनेक शाळकरी मुलांनासुद्धा आपल्या पोटासाठी मिळेल ते काम करावं लागतं. पण सध्या एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पैशासाठी डोक्यावर पावाची लादी घेऊन जाताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ एका बेकरीबाहेरचा आहे. एक मुलगा बेकरीतून एक पावाची लादी घेऊन येतो आणि डोक्यावर घेऊन सायकलवर बसतो. त्यानंतर पुढे तो रहदारीच्या मोठ्या रस्त्याने जाताना दिसत आहे. तर अशा अनेक मुलांना किंवा तरूणांना आपल्या पोटासाठी किंवा शिक्षणासाठी काम करावे लागते. हा व्हिडिओ पाहून आपणही भावूक व्हाल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT