Tanumita Ghosh Viral Video  
Trending News

Viral Video: मुंबईच्या रस्त्यावर टॉवेल गुंडाळून फिरत होती तरुणी, अचानक टॉवेल काढला अन् उडाली खळबळ

Young Woman in towel walking on Mumbai streets: व्हिडिओमध्ये पाहायला मिळंतय की, एक तरुण मुंबईच्या रस्त्यावर अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून फिरत आहे. रस्त्यावरील लोक हा सर्व प्रकार पाहून अचंबित होतात.

कार्तिक पुजारी

मुंबई- सोशल मीडियावर कधी-काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. आजकाल लोक सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी किंवा काही लाईक्स मिळवण्यासाठी वाटेल ते करत असताना दिसत आहेत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक तरुणी टॉवेल गुंडाळून भर रस्त्यात फिरत आहे. सदर व्हिडिओ मुंबईमधील आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळंतय की, एक तरुण मुंबईच्या रस्त्यावर अंगावर फक्त टॉवेल गुंडाळून फिरत आहे. रस्त्यावरील लोक हा सर्व प्रकार पाहून अचंबित होतात. सगळ्यांच्या नजरा या मुलीवर असतात. माहितीनुसार हा व्हिडिओ Myntra फॅशन सुपरस्टारची विजेती तनुमिता घोष हिचा आहे. तनुमिता घोष हिला इन्स्टाग्रामवर ३७ हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

तनुमिता घोष अंघोळ करून थेट रस्त्यावर आली आहे का काय, असा भास होता. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'तौबा-तौबा' हे गाणे वाजत आहे. त्यामुळे रस्त्यावरील लोक हा व्हिडिओ पाहून नक्कीच तौबा-तौबा करत असतील. व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तनुमिता घोष हिनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोक यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या या कृतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अन् अचानक तिने टॉवेल काढला

व्हिडिओमध्ये तनुमिता टॉवेलवर फिरतेच, पण अचानक ती आपला टॉवेल काढते. तिथे अनेक लोक उपस्थित असतात. तिच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे लोक बुचकळ्यात पडतात. पण, तिने आतमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो. त्यानंतर ती पुढे चालत येते, एकाचा जॅकेट घालते अन् काळा चष्मा घालून स्टाईल मारले. त्यानंतर व्हिडिओ संपतो.

प्रसिद्धीसाठी काहीपण!

युझर्सनी तनुमिता घोष हिच्यावर टीका केली आहे. प्रसिद्धिसाठी काहीही करायचं का? असा सवाल त्यांनी केला आहे. यावर तनुमिताने स्पष्टीकरण दिलंय की, हा व्हिडिओ २०१९ चा आहे. ज्यात तिला एका शोमध्ये टास्क देण्यात आले होते. त्यामुळे याला गंभीरतेने घ्यायला नको. हे केवळ एक मनोरंजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT