-
Union Budget 2026 Updates

Budget 2022 : राजधर्म कोणता? अर्थमंत्र्यांनी सांगितला महाभारतातला श्लोक

सकाळ डिजिटल टीम

स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाची ब्लू प्रिंट म्हणजे हा अर्थसंकल्प आहे असं निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. स्वातंत्र्याच्या १०० व्या वर्षाची ब्लू प्रिंट म्हणजे हा अर्थसंकल्प आहे असं निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं. सामाजिक जबाबदारी पेलताना राजधर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासाठी त्यांनी भाषणावेळी महाभारतातील शांतिपर्वातल्या राजधर्माच्या व्याख्येचा उल्लेख केला.

सीतारामन यांनी म्हटलं की, केंद्र सरकारचा उद्देश या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकांचे कल्याण करताना राजधर्माचे पालन करणे हा आहे. उदाहरणा दाखल त्यांनी महाभारताच्या शांतीपर्वात ७२ व्या अध्यायातील ११ वा श्लोक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितला.

सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना युधिष्ठिराच्या राजधर्माच्या व्यवस्थेसंदर्भात जनतेचं कल्याण आणि संरक्षणाच्या श्लोकाचा उल्लेख केला.

दापयित्वा करं धर्म्यं राष्ट्रं नित्यं यथाविधि |

अशेषान्कल्पयेद्राजा योगक्षेमानतन्द्रितः ।।

हा श्लोक निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणावेळी सांगितला. याचा अर्थ कोणत्याही राष्ट्राचा राजधर्म हा कोणत्याही प्रकारे जनतेचं कल्याण आणि संरक्षण करणं हाच आहे.

शांतीपर्व हे महाभारताचं १२ वं पर्व आहे. यात धर्म, दर्शन, राजकारण आणि अध्यात्माचा समावेश आहे. या पर्वात महाभारताच्या युद्धानंतर शोकाकूल लोकांना युधिष्ठिर राजधर्म म्हणजे काय ते सांगतो. तसंच मोक्षाचा उपदेशही तो देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT