Rahul Gandhi  
Union Budget Updates

बजेटवेळी सभागृहातच राहुल गांधींचा डोक्याला हात, झाले ट्रोल

सोशल मीडियावर यूजर्सकडून राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणात मीम्स शेअर केले जात आहेत.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2022) यांनी आज (मंगळवारी) लोकसभेत 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. (Nirmala Sitharaman) 2022 च्या अर्थसंकल्पात जनतेसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, सभागृहात उपस्थित असलेले सर्व खासदार अर्थमंत्र्यांच्या घोषणा लक्षपूर्वक ऐकत होते. पण दरम्यान, लोकसभेतून राहुल गांधींचे (Rahul Gandhi) असे चित्र समोर आले आहे, ज्यामध्ये ते डोके धरून बसलेले दिसत आहेत. त्यांच्या या फोटोनंतर सोशल मीडियावर यूजर्सकडून राहुल गांधींच्या फोटोबद्दल मोठ्या प्रमाणात मीम्स शेअर केले जात आहेत. (Rahul Gandhi Memes On Social Media After Budget)

बजेटबाबत राहुल गांधी काय विचार करत आहेत?

आणखी एका युजरने राहुल गांधींचे मीम (Memes After Budget 2022) शेअर करताना ट्विट केले की, 'राहुल गांधी विचार करत आहेत की 2022 चा अर्थसंकल्प का सादर केला जात आहे?' याशिवाय गोपू नावाच्या युजरने ट्विट केले की, जेव्हा रिपोर्टरने राहुल गांधींना बजेटबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, मी त्यातला तज्ज्ञ नाही.

काँग्रेसकडून अर्थसंकल्पावर टीका

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारने देशातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्गीयांना दिलासा न देऊन ‘विश्वासघात’ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे की, 'भारतातील पगारदार वर्ग आणि मध्यमवर्ग या महामारीच्या काळात दिलासा मिळण्याची आशा करत होते. मात्र, अर्थमंत्री आणि पंतप्रधानांनी पुन्हा एकदा या वर्गांची घोर निराशा केल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT