Budget Updates  sakal
Union Budget 2026 Updates

Budget Updates | घोषणा ६ हजार कोटींची पण प्रत्यक्षात मिळाले किती?

केवळ निधीचीच तरतूद नको, दुसऱ्या टप्प्याला हवी मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

घोषणा ६ हजार कोटींची पण प्रत्यक्षात मिळाले किती?

केवळ निधीचीच तरतूद नको, दुसऱ्या टप्प्याला हवी मंजुरी

नागपूर : मेट्रोच्या पहिल्या टप्प्याने नागपूरकरांच्या शिरपेचात तुरा रोवला. पहिल्या टप्प्यातील जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असून नागपूरकर प्रवासाचा आनंद लुटत आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होतानाच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यालाही मागील फडणवीस सरकारने मंजुरी दिली. मागील वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी पाच हजार ९७६ कोटी रुपयांची घोषणा केली. परंतु या प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटचीच मंजुरी न मिळाल्याने मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे. त्यामुळे केवळ तरतूद नको तर प्रकल्पाला मंजुरी देण्याचीही अपेक्षा नागपूरकरांनी व्यक्त केली.

शहराचा मध्यभाग कामठी, कन्हान, बुट्टीबोरी, हिंगणा या उपनगरांशी जोडण्यासाठी मेट्रोने २०१८ मध्ये मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा आराखडा तयार केला होता. या आराखड्यास राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. राज्यातील मागील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जानेवारी २०१९ मध्ये ११ हजार २१६ कोटींचा खर्चाच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली होती.

सद्यस्थितीत वर्धा मार्गावर खापरीपर्यंत तर हिंगणा मार्गावर लोकमान्यनगरापर्यंत मेट्रो धावत आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरही ट्रायल घेण्यात आली असून हा मार्गही लवकरच सुरू होणार आहे. गड्डीगोदाम उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील काही महिन्यात या भागातही मेट्रो धावताना दिसणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कामठी मार्गावर ऑटोमोटिव्ह चौकापासून पुढे कन्हानपर्यंत तर वर्धा मार्गावर मिहानपासून बुटीबोरीपर्यंत, हिंगणा मार्गावर लोकमान्यनगरपासून हिंगण्यापर्यंत मेट्रोसाठी दुसऱ्या टप्प्याचा आराखडा केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. राज्याच्या मंजुरीनंतर केंद्राकडे पाठविलेला हा आराखडा दोन वर्षापासून केंद्राकडे प्रलंबित आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत हा आराखडा असल्याने मागील वर्षी अर्थसंकल्पात केंद्रीयी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद जाहीर करूनही या प्रकल्पाला एकही रुपया मिळू शकला नाही. त्यामुळे नागपूरकरांनी आता केवळ तरतूद नको, दुसऱ्या टप्प्याला मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

११ हजार कोटींचा प्रकल्प

मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात ४४ किमी मेट्रो मार्गाची भर पडणार आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ११ हजार २१६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारचाही हिस्सा राहणार आहे.

प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातून शहरातील अनेकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. दुसऱ्या टप्प्यातही अशाप्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. स्टेशनवरील प्रॉपर्टी डेव्हलपमेंटमधून दुकाने लावण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'गौतम गंभीरच्या आधी, मी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनलो असतो, पण...'; VVS Laxman च्या दाव्याने खळबळ; नेमकं तेव्हा काय घडलं?

तुकाराम मुंढेंचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांकडे; अभिनेते परेश रावल यांनी फडणवीसांकडे केली 'खास' मागणी, म्हणाले...

Marathi News Live Updates : NEET-UG पेपर लीक प्रकरण : राऊस अ‍ॅव्हेन्यू कोर्टाचा निर्णय पुढे ढकलला; आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

SCROLL FOR NEXT