Stocks to Buy Esakal
Union Budget Updates

Budget 2022: बजेटपूर्वी 'हे' 10 स्टॉक्स घ्या, तगडी कमाई करा; तज्ज्ञांचा सल्ला

शिल्पा गुजर

गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प शेअर बाजाराला खूप आवडला होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या वाढीसह बंद झाले. अर्थसंकल्पानंतरही ते तेजीत राहिले. याहीवेळी तीच स्थिती राहिल अशी आशा शेअर बाजारातून व्यक्त होत आहे.

2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारातील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. पण ही निराशा आशेमध्ये बदलू शकते. कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही शेअर्सची लिस्ट देणार आहोत ज्यात बजेटपुर्वी गुंतवणूक केल्यास तुम्हाला हमखास फायदा होईल. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने शिफारस केलेल्या 10 स्टॉक्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही 3 ते 6 महिन्यांत चांगला नफा मिळवू शकता. या लिस्टमध्ये L&T, Axis Bank, Tata Motors, United Spirits सारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे.

शेअर टारगेट

एल अँड टी 2,168 रुपये
एक्सिस बँक 870 रुपये
टाटा मोटर्स 555 रुपये
युनायटेड स्पिरिट्स 970 रुपये
बँक ऑफ बडोदा 116 रुपये
कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 698 रुपये
केपीआर मिल्स 765 रुपये
नॅशनल अल्युमिनियम 125 रुपये
भारत डायनामिक्स 548 रुपये
केएनआर कंस्ट्रक्शन्स 358 रुपये

ICICI सिक्युरिटीजला भारत डायनॅमिककडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या स्टॉकने वाढत्या व्हॉल्यूमसह ब्रेकआउट दिला आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातही चांगली संधी आहे. केपीआर मिल्सची कामगिरी खूप चांगली झाली आहे. दोन महिन्यांच्या सुस्त हालचालीनंतर बँकिंग निर्देशांकानेही चांगली ताकद दाखवली आहे.

ब्रोकरेज फर्मने बँक ऑफ बडोदाबाबतीत चांगली मत व्यक्त केले आहे. इतर बँकांच्या तुलनेत या बँकेची कामगिरी चांगली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात बँक ऑफ बडोदाचे शेअर्स चांगली कमाई करुन देतील.

त्यामुळेच बजेटआधी हे शेअर्स घेतले तर बजेटनंतर या शेअर्समध्ये मोठी हालचाल आणि तेजी येईल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल असा विश्वास ब्रोकरेज फर्म्ससह तज्ज्ञांना वाटत आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT