mental stress 
Union Budget 2026 Updates

जनतेच्या मानसिक आरोग्याची सरकार घेणार काळजी; 'टेलिमेन्टल हेल्थ'ची घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

Union Budget 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पात मंगळवारी मानसिक आजारांसंबधी कार्यक्रमाची सरकारकडून घोषणा करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासाठी टेलिमेंटल हेल्थ कार्यक्रम सुरु करण्यात येणार असल्याचं सांगितलं. हा कार्यक्रम मुख्य माणसिक आरोग्य संस्थेमार्फत २३ मनोरुग्णालयात सुरु करण्यात येणार आहे. (govt will take care of mental health of people announcement Telemetal Health in Budget 2022)

काय आहे टेली मेन्टल हेल्थ कार्यक्रम?

अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की, IIT बंगळुरुनं खास टेली कन्सल्टेशन सेवांच्या संचालनासाठी तांत्रिक पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी म्हटलं की, महामारीनं सर्व वयाच्या लोकांसाठी मानसिक आरोग्य समस्या निर्माण केल्या आहेत. अशातच मानसिक आरोग्याच्या देखभाल सेवांवर चांगला पर्याय देण्यासाठी राष्ट्रीय टेलि मेंटल हेल्थ कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.

लोकांच्या समस्या कशा दूर केल्या जातील?

NIMHANS च्या सेंटर फॉर सायकॉलॉजिकल सहकार्यानं कोविड माहामारी दरम्यान एक राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला होता. याचा हेतू महामारी आणि लॉकडाउनदरम्यान मानसिक आणि मनोवैज्ञानिक अडचणींचा सामना करत असलेल्या लोकांसाठी मदत उपलब्ध करुन देणं हा होता. याअंतर्गत सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण मोफत मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोच निश्चित केली जाईल. याशिवाय हा प्रोग्राम देशभरात मानसिक आरोग्य सेवांपर्यंत पोहोचण्यात एक मोठं अंतर पार करण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP: ना परीक्षा, ना शारीरिक चाचणी; खेळाडूंना शैक्षणिक पात्रतेतही सूट! दरवर्षी निघणार पोलीस उपनिरीक्षकांची पदे

Latur: लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके; तापमान ३८ अंशांवर; औराद शहाजनी चाळिशीच्या उंबरठ्यावर

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

Mahabaleshwar ST Bus: महाबळेश्वरमध्ये नव्या एसटी बसची एंट्री; आकर्षक लूकला पसंती, आसनरचनेवर टीका, प्रवाशांत नाराजी

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

SCROLL FOR NEXT