India Defence Budget 2023 esakal
Union Budget 2026 Updates

India Defence Budget : भारताच्या तुलनेत चीन-पाकिस्तानचं संरक्षण बजेट किती? पाहा आकडेवारी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (बुधवार) म्हणजेच, 1 फेब्रुवारीला संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

सकाळ डिजिटल टीम

शेजारील देश चीन (China) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) तुलनेत भारताचं संरक्षण बजेट किती आहे हे समजून घेऊ.

India Defence Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (बुधवार) म्हणजेच, 1 फेब्रुवारीला संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी (2023-24 वर्ष) एकूण 5.94 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. गेल्या वर्षी भारताचं संरक्षण बजेट 5.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं.

2022 च्या तुलनेत संरक्षण बजेटमध्ये 10 टक्क्यांनी वाढ

हे बजेट एकूण 13.31 टक्के इतकं होतं. यामध्ये संरक्षण निवृत्ती वेतनासाठी 1.19 लाख कोटी रुपयांचा समावेश आहे. हा अर्थसंकल्प मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दहा टक्के अधिक होता. गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकार आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करत आहे.

देशाची सूत्रं हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदी (PM Modi) संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. संरक्षण क्षेत्राला बळकटी देणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, गेल्या काही वर्षांत चीनसोबत भारताच्या सीमेवर अनेकदा तणाव निर्माण झाला आहे.

पाकिस्तानचं संरक्षण बजेट भारताच्या तुलनेत खूपच कमी

शेजारील देश चीन (China) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) तुलनेत भारताचं संरक्षण बजेट किती आहे हे समजून घेऊ. जर आपण पाकिस्तानच्या बजेटबद्दल विचार केला तर 2021 मध्ये पाकिस्तानचं संरक्षण बजेट 11.3 अब्ज डॉलर होतं. त्याच वेळी 2021 मध्ये भारताच्या संरक्षण बजेटसाठी 76.6 अब्जची तरतूद करण्यात आली होती.

चीनचा अर्थसंकल्प भारताच्या तुलनेत 4 पट अधिक

चीनच्या संरक्षण क्षेत्रातील खर्चाबद्दल बोलायचं झालं तर जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये चीनचा लष्करी खर्च 293.35 अब्ज होता. त्याच वेळी भारतानं त्या वर्षी संरक्षणावर 76.6 अब्ज खर्च केले. म्हणजे, चीनचं संरक्षण बजेट भारताच्या 4 पट जास्त आहे. विशेष बाब म्हणजे, संरक्षण क्षेत्रातील भारताचा खर्च चीनच्या तुलनेत कमी असू शकतो. परंतु, 2021 मध्ये भारतानं आपल्या जीडीपीच्या 3 टक्के संरक्षणावर खर्च केला होता. दुसरीकडं, चीननं आपल्या जीडीपीच्या केवळ 1.7 टक्के निधी संरक्षण क्षेत्रात खर्च केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT