raju shetti esakal
Union Budget 2026 Updates

अर्थसंकल्पीय Budget म्हणजे फक्त स्वप्नांचा मनोरा; राजू शेट्टी

अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारे बजेट ; शेट्टी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: यावर्षीचा अर्थसंकल्पीय बजेट हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी (Agriculture Budget 2022) सुधारणाच्या नावाखाली केवळ स्वप्नांचा मनोरा बांधला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पाऊण टक्‍क्‍याने शेतीचे बजेट कापण्यात आले अशी निराशाजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केल्यानंतर राज्यभरातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शेतकरी नेत्यांनीही आजच्या बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती करण्याची भाषा अर्थमंत्री करत आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी महाविद्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. फेसबुकवर, व्हाट्सअपवर गव्हाची शेती करता येत नाही. इंस्टाग्रामवर द्राक्षाची शेती करता येत नाही. २०१६ साली मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. मात्र या उलट महागाईचा दर जास्त वाढला आहे. शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगपतींचे उत्पन्न दुप्पट झालं. आणि शेतकरी मात्र कर्जबाजारी झाला.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्व माल हमी भावाने खरेदी करतात असे मंत्री सांगतात. अनेक ठिकाणी याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्वांना मी आठवण करून देतो, गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदी साठी २ लाख ४७ कोटी हजार रुपयांची तरतूद केली होती. मात्र गेल्यावर्षी सर्व शेतीमाल सरकारने खरेदी केला नाही. सगळे पैसे खर्च झाले, मात्र शेतकऱ्यांच्यात कोठेही आनंद दिसला नाही. यावर्षीच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये १० हजार कोटीची कपात केली आहे.

गेल्या वर्षी एकूण बजेटच्या ४.३६ टक्के तरतुद शेतीसाठी होती. मात्र यावर्षी ती ३.७६ टक्के इतकी तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पाऊण टक्‍क्‍याने शेतीचे बजेट कापण्यात आले आहे. या बजेटचे स्वागत करण्यासारखं काहीही नाही. ज्यांना राज्यकर्त्यांना खूष करायचा आहे, पदरात काही तरी पाडून घ्यायचा आहे त्यांनी खुशाल या अर्थसंकल्पाचे स्वागत करावं. अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारे हे बजेट असल्याची तिखट प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे.

मोदी सरकारने ६० लाख नोकऱ्या निर्माण करायची आश्वासने दिली. मात्र प्रत्यक्षात ज्या उद्योगातून रोजगार निर्माण होतो अशा वस्त्रोद्योग आणि साखर उद्योगासाठी कोणतीही तरतूद मात्र केली नाही. मग कसा रोजगार निर्माण होणार असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT