Railway 
Union Budget 2026 Updates

Budget 2021 : राज्याच्या वाटेला चारच रेल्वे प्रकल्प

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित नवीन मार्ग व विद्युतीकरणासारख्या कामांबाबत पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, उत्तर प्रदेश यासारख्या भरभरून देताना महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते आहे. यंदा स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरवात किंवा पूर्तता होणाऱ्या एकूण ८९ प्रस्तावित प्रकल्पांपैकी राज्यातील फक्त चार प्रकल्पांचा समावेश आहे. 

याशिवाय नागपूर मेट्रोसाठी ५,९७६ कोटी रूपये तर नाशिकच्या टायर बेस मेट्रोसाठी २,०९२ कोटी रूपयांचे साह्य केंद्राकडून मिळणार आहे. दरम्यान, नव्या वर्षांत प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात फारशी वाढ रेल्वेनेच अपेक्षित धरलेली नसल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी मान्य केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिल्ली-मुंबई वेगळ्या मालवाहतूक मार्गिकेचे काम वेगाने पूर्ण करण्यावर रेल्वे अर्थसंकल्पात जोर दिला आहे. आजच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ज्या नवीन कामांच्या तरतुदी आहेत त्यात पुणे-कोल्हापूर या ३२१ किमी मार्गाचे विद्युतीकरणासह चार प्रकल्प राज्याच्या वाट्याला आले आहेत. तेही सर्व प्रकल्प फक्त राज्यातील नाहीत तर त्यातील ३ प्रकल्प दुसऱ्या राज्यांनाही जोडणारे आहेत.

राज्यातील प्रकल्प 

  • पुणे-कोल्हापूर विद्युतीकरण (३२१ किमी) 
  • पनवेल-रत्नागिरी-मंगलोर मार्गाचे विद्युतीकरण (६९७ किमी) 
  • अकोला-पूर्णा-सिकंदराबाद विद्युतीकरण (५१५ किमी) 
  • दौंड -गुलबर्गा दुपदरीकरण (२२५ किमी, १५ ऑगस्टनंतर काम सुरू होणे अपेक्षित) 
  • माथेरान रेल्वेला विस्टोडॅम डबे लावणे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT