neo and metro, lite technique, chennai, bengaluru, nasik kocchi, nagpur metro rail, Pune, Mumbai
neo and metro, lite technique, chennai, bengaluru, nasik kocchi, nagpur metro rail, Pune, Mumbai  
Union Budget Updates

Budget 2021 : मोदी सरकारची नागपूर-नाशिकवर 'माया'; पुणे-मु्ंबईचे हात रिकामे

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2021 updates :  मुंबईतील बुलेट ट्रेन आणि पुण्यातील मेट्रो विकास यावर अधिक भर देणाऱ्या मोदी सरकारने शहरी विकासाच्या विस्तारातून मात्र पुणे-मुंबई मेट्रोकडे दुर्लक्ष केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021 वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी राज्यातील नाशिक आणि नागपूर या दोन शहरांच्या विकासासाठी मेट्रोचे संदर्भात विशेष घोषणा केली. मात्र मुंबई आणि पुणे शहरासंदर्भात कोणतीही घोषणा केली नाही. 

नागपुर मेट्रो -2 साठी 5, 976 कोटी आणि नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रूपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.  ब्रॉडगेजचे 100 टक्के विद्युतीकरणाचाही यात समावेश आहे. मेट्रो रेल्वे नेटवर्क विस्तार आणि सार्वजनिक बससेवेसाठी आर्थिक तरतुद करण्यात आली असली तरी पुणे-मुंबईच्या विकासाचा अर्थसंकल्पात कोणताही उल्लेख नाही. 

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणानंतर बजेटच्या पेठाऱ्यातून कोच्ची, चेन्नई, बंगळुरु, नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी खास तरतूद केल्याची घोषणा केली. मेट्रोचे कामासाठी लाइट आणि नियो या दोन तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात येणार आहे, असेही निर्मला सीतारमण यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून केंद्र आणि राज्य असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. अर्थसंकल्पात मुंबई-पुणे शहराकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजकीय संघर्षात आणखी एक भर पडल्याचे दिसू शकते. या मुद्यावरुन पुणे मुंबईतील राजकीय मंडळीतून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 
 

राज्याला काय मिळाले

- नागपुर मेट्रो -2 साठी 5, 976 कोटी व नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रूपयांची तरतुद
- ब्रॉडगेजचे 100 टक्के विद्युतीकरण
- मागील वर्षीच्या सुरक्षा उपाययोजनाचे परिणाम प्राप्त
- मेट्रो रेल्वे नेटवर्क विस्तार व सार्वजनिक बससेवेसाठी आर्थिक तरतुद
- 1 हजार 16 किलोमीटरचे मेट्रो व आरआरटीएस 27 शहरात निर्माणाधीन
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT