PM Gati Shakti announced FM Nirmala Sitharaman
PM Gati Shakti announced FM Nirmala Sitharaman Sakal Digital
Union Budget Updates

Union Budget 2022: काय आहे 'पीएम गती शक्ती' मास्टर प्लॅन?

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प २०२२-२३ संसदेच्या पटलावर ठेवता 'पीएम गती शक्ती' (PM Gati Shakti) योजनेचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या भाषणात पीएम गती शक्ती योजनेचा विशेष उल्लेख केला. त्यांनी पीएम गती शक्ती योजना ही आर्थिक वृद्धी आणि शाश्वत विकासासाठी महत्वाची आणि अमुलाग्र बदल करणारी योजना आहे. (Union Budget 2022 FM Nirmala Sitharaman Announce PM Gati Shakti Master Plan)

निर्मला सीतारामन यांनी या योजनेबद्दल सांगितले की, 'पीएम गती योजनेचे सात महत्वाची इंजिन आहेत. यात रस्ते, रेल्वे, विमानतळे, खेळ, अवजड वाहतूक, जलमार्ग आणि दळणवळण पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. ही सात इंजिन अर्थव्यवस्थेला (Economy) एकत्रित पुढे नेत असतात. या 'पीएम गती शक्ती' योजनेत राज्य सरकारच्या पायभूत सुविधांचे उपक्रमही समाविष्ट होतात. या योजनेचा मुख्य उद्येश हा आराखडा तयार करणे त्यासाठी नवनवीन मार्गाने वित्तीय तरतूद करणे तंत्रज्ञानाचा वापर करणे, वेगवान अंमलबजावणी हा आहे.'

अर्थमंत्र्यांनी 'पीएम गती शक्ती' योजनेअंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात एक्सप्रेस वे (Expressways) साठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. यामुळे पब्लिक ट्रन्सपोर्ट, मालवाहतूकीच्या वेगवान दळणवळणाची सुविधा निर्माण होईल. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे २०२२-२३ मध्ये २५ हजार किलोमिटर विस्तारायंच आहे. यासाठी २० हजार कोटी रूपयांची तरतूद केली जाईल. (Union Budget 2022)

याचबरोबर पीएम गती शक्ती योजनेत सर्वसमावेशक विकास, उत्पादन क्षमता आणि गुंतवणूक वाढवणे, नव्या संधीची पहाट, उर्जेचे संक्रमण आणि वातावरण बदल कृती आणि गुंतवणूक या चार गोष्टींना महत्व देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ४०० नव्या वंदे भारत ट्रेन्स (Vande Bharat trains) तीन वर्षात रूळावर उतरवण्यात येणार आहेत. याचबरोबर १०० पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल्स विकसित केले जाणार आहेत. याची अंमलबजावणी नाविन्यपूर्णरित्या करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शहरात त्यांच्या गरजेनुसार मेट्रो ट्रेन्सचे (Metro Trains) जाळे उभारण्यात येईल.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: संतापजनक! पोर्शे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या; पोलीस आयुक्तांनी घेतली दखल

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update: मुंबईतल्या संथ मतदानाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

Mumbai Election: मतदानादिवशी ढिसाळ कारभार, सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री शिंदेंकडून चौकशीचे आदेश

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

SCROLL FOR NEXT