Budget 2023 google
Union Budget 2026 Updates

Budget 2023 : ३८ हजार शिक्षकांची नियुक्ती; साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण

देशाच्या विकासासाठी शिक्षक महत्त्वाचे. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी विविध योजना

नमिता धुरी

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यापासून देशातील शिक्षणव्यवस्थेत बदलाचे वारे वाहात आहेत. त्यामुळे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल अशी आशा शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनाच आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती सरकार करणार आहे. तसेच साडे तीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी एकलव्य शाळांची निर्मिती केली जाणार आहे. हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

देशात सध्या शालेय शिक्षणाची अवस्था फार वाईट आहे. करोना काळानंतर या व्यवस्थेला आणखी धक्के बसले आहेत.

शिक्षणाच्या डिजिटायजेशनचे मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेसमोर आहे. त्याच वेळी पायाभूत सुविधांचा प्रश्नही मोठा आहे.

देशातील अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. आदिवासी भागात आजही शिक्षण पोहोचलेले नाही. या प्रश्नांकडे आता विशेष लक्ष दिले जाणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एकलव्य शाळा काम करतील. तसेच देशभर ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती केली जाईल.

नव्या अर्थसंकल्पानुसार खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. देशाच्या विकासासाठी शिक्षक महत्त्वाचे आहेत असे सीतारामन म्हणाल्या. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत.

लहान मुलं आणि शाळकरी मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. विविध विषयांची पुस्तके येथे उपलब्ध होतील. नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यासक्रमेतर ज्ञानासाठी मुलांच्या वयानुसार साहित्य उपलब्ध केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT