Budget 2023 sakal
Union Budget 2026 Updates

Budget 2023 : अर्थसंकल्पात युवकांसाठी नवीन काय ? शिक्षण आणि रोजगाराला प्रोत्साहन

युवकांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी देशभर ३० स्कील इंडिया सेंटर्स उभारली जाणार आहेत.

नमिता धुरी

मुंबई : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात युवकांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. तरुणांना अधिकाधिक रोजगाराभिमुख बनवण्यासाठी इंडस्ट्रीत आवश्यक असलेल्या कौशल्यांच्या प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे.

युवकांमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी देशभर ३० स्कील इंडिया सेंटर्स उभारली जाणार आहेत. इंडस्ट्रीत प्रत्यक्ष काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या सेंटर्समध्ये दिले जाणार आहे. (union budget 2023)

रोजगार देणारे आणि रोजगार घेणारे यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे.

या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सूक्ष्म, लघु, मध्यम असे सर्व प्रकारचे उद्योग असणारे व्यावसायिक एकत्र येऊ शकतील. या माध्यमातून रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना रोजगारासाठीचा संघर्ष कमी होईल.

स्टार्टअपला पूर्वी ७ वर्षे करसवलत दिली जात होती. आता ही सवलत १० वर्षे दिली जाणार आहे. औद्योगिक तंटे सोडवण्यासाठी साहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT