Union Budget 2023 Nirmala Sitharaman
Union Budget 2023 Nirmala Sitharaman esakal
Union Budget Updates

Union Budget : निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकार 'या' राज्यावर मेहरबान; अर्थसंकल्पात 'इतक्या' कोटींची तरतूद

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 5300 कोटींच्या निधीची घोषणा केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर (Union Budget 2023) केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.

तर, 2023 मध्ये देशातील 9 मोठ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Election) होणार आहेत. जर जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका झाल्या तर ही संख्या 10 पर्यंत वाढणार आहे. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. अशा स्थितीत निवडणूक असलेल्या राज्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीतरी विशेष असू शकेल, अशी अपेक्षा होती.

त्याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात आज कर्नाटकावर केंद्र सरकार मेहरबान होत मोठा निधी दिला आहे. कर्नाटकात यावर्षी मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच अनुषंगानं पंतप्रधान मोदी-अमित शाहांचे दौरेही इथं सुरु आहेत. नव्या वर्षात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यामुळं कर्नाटकच्या निवडणुकीवर केंद्राचं विशेष लक्ष आहे.

त्यामुळं निवडणूक असलेल्या राज्यांसाठी सरकार आपली तिजोरी उघडत आहे. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी कर्नाटक राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 5300 कोटींच्या निधीची घोषणा केली. हा 5300 कोटी रुपयांचा निधी दुष्काळी भागांसाठी वापरला जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, 'मध्य कर्नाटकमधील दुष्काळी भागातील तलाव आणि टाक्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 5,300 कोटी रुपये दिले जाणार आहेत.'

कर्नाटक दुष्काळानं होरपळतंय

सध्या कर्नाटकात भीषण दुष्काळाचं सावट आहे. कर्नाटक हे आधीच देशातील पाण्याचा ताण असलेल्या राज्यांपैकी एक आहे. राज्यातील सुमारे 61 टक्के क्षेत्र दुष्काळग्रस्त भागात मोडतं. कर्नाटक गेल्या दोन दशकांत 15 वर्षांहून अधिक काळ दुष्काळानं होरपळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT