Union Budget 2026 Updates

Union Budget 2024: "घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन..."; खासदार अमोल कोल्हेंच्या ट्विटची चर्चा

केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पावर टीका करताना विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका करताना ट्वीट केलं आहे. पण या ट्विटची सध्या चर्चा रंगली आहे.

अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणं बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठं पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं. पण यामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काहीच आलेलं नाही. यावरुनच अमोल कोल्हे यांनी वेगळ्या पद्धतीनं नेमक्या शब्दांत यावर भाष्य केलं आहे. गणेशाच्या आरतीच्या स्वरुपात त्यांनी आपलं म्हणणं शब्दबद्ध केलं आहे.

अमोल कोल्हेंनी काय ट्विट केलंय?

कोल्हे म्हणतात...

आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश :

घालीन लोटांगण वंदीन बिहार,

डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,

दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,

सरकार वाचवेन म्हणे नमो !!

बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच केंद्र सरकार सध्या सत्तेत आहे. यापार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेशला जाहीर झालेल्या पॅकेजबाबत भाष्य केलं आहे. म्हणजेच बिहार आणि आंध्र प्रदेशला जाहीर झालेलं पॅकेज आणि महाराष्ट्राकडं केलेलं दुर्लक्ष यामध्ये राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT