Budget 2023  Sakal
Union Budget 2026 Updates

Budget 2023 : अर्थमंत्री सारखं म्हणतात ते 'अमृत काल' म्हंजे काय रं भौ?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडताना वारंवार अमृत काल असा उल्लेख केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

"अमृत काळातला हा पहिला अर्थसंकल्प आहे. मागच्या अर्थसंकल्पनाने घालून दिलेला पाया भक्कम करण्याची आणि इंडिया अॅट १०० ची ब्लूप्रिंट सत्यात आणण्याची आशा या अर्थसंकल्पाकडून आहे. विकासाची फळं सगळ्यांना चाखायला मिळतील, अशा सर्वसमावेशक भारताकडे आम्ही वाटचाल करत आहोत", असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या भाषणात म्हणाल्या.

निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी आपल्या भाषणामध्ये त्यांनी वारंवार 'अमृत काल' असा उल्लेख केला. या अर्थसंकल्पाने महिला, तरुण आणि वंचितांसाठी भविष्यवेधी अमृत काळ आणला आहे, असंही सीतारामन म्हणाल्या.

हा अमृत काल म्हणजे नक्की काय?

२०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काल ही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती. देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना मोदींनी हा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी देशासाठी पुढच्या २५ वर्षांचा रोडमॅप मांडत असताना अमृत काल असा उल्लेख केला होता.

भारतीयांचं जीवनमान सुधारणं आणि गाव व शहरातली विकासाची दरी कमी करणं हे अमृत काळाचं उद्दिष्ट आहे. सार्वजनिक आयुष्यामध्ये सरकारचा अडथळा कमी करणं आणि आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटायझेशनची वाट धरणं हेही या अमृत काळाचं उद्देश आहे.

अमृत काळ या शब्दाचं मूळ वेदांमध्ये आढळून येतं. अमृत काळ हा कोणतंही नवं काम सुरू कऱण्यासाठी सर्वोत्तम आणि मंगल काळ असल्याचं मानलं गेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Chatbox As Referee : जेन-झीच्या प्रेमात डिजिटल ट्विस्ट; भांडणं मिटवण्यासाठी AI बनतोय ‘पंच’, पॅचअपसाठी वाढतोय तरुणांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : युद्धामुळे बंद झालेल्या केळी निर्यातीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

Thackeray group Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार, मोठ्या नियोजनाच्या तयारीत

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा पुन्हा धक्का! सभापतिपदेही मिळवली; राष्ट्रवादी- शिवसेनेचा बहिष्कार, मंत्री गाेरेंचे वर्चस्व..

Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

SCROLL FOR NEXT