fund sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : सिद्धेश्वर मंदिर चौकासह पथदीपांसाठी 1 कोटी; अग्रवाल यांचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील पांझरा नदीकाठावरील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण होणार आहे. तसेच रस्त्यालगत अद्ययावत पद्धतीचे पथदीप बसविले जाणार आहेत. त्यामुळे शिवाजी रोडचा चेहरामोहरा बदलणार आहे. (1 crore sanctioned for street lights including Siddheshwar Mandir Chowk dhule news)

याकामी भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी एक कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यांच्या समर्थकांनी ही माहिती दिली.

पांझरा नदीकाठी पुरातन श्री सिद्धेश्वर गणपती मंदिर आहे. सिद्धेश्वर मंदिर चौक सुशोभित व्हावा, त्याचे सुशोभीकरण केल्याने परिसराचा कायापालट होईल. हा परिसर निसर्गरम्य होईल या उद्देशाने श्री. अग्रवाल यांनी चौक सुशोभीकरणाचा तसेच शिवाजी रोडचा कायापालट करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्यास यश आले. राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत महापालिकेला एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधींतर्गत लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होऊन सिद्धेश्वर गणपती मंदिर चौक सुशोभित होईल आणि शहराच्या वैभवात भर पडेल, असे श्री. अग्रवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT