Special Inspector General of Police of Nashik district while returning the two-wheelers seized in various crimes to the complainants. B. G. Shekhar Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule: 1 कोटीचा हस्तगत मुद्देमाल तक्रारदारांना परत; पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : विविध गुन्ह्यांत जिल्हा पोलिसांनी हस्तगत केलेला सुमारे एक कोटीचा मुद्देमाल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला.

येथील पोलिस कवायत मैदानावर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हस्तांतर सोहळा झाला. (1 Crore seized goods returned to complainants Inspector General of Police Program by BG Shekhar Patil Dhule)

जिल्ह्यात दाखल दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारख्या विविध गुन्ह्यांतील तक्रारदारांचे चोरी झालेले सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली, शेतीपयोगी औजारे आदी मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस ठाण्यांनी तपास करून गुन्हे उघडकीस आणले.

गुन्ह्यातील आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलिस दलाने जप्त केलेला हा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यासाठी पुढाकार घेऊन न्यायालयात यासाठी पाठपुरावा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तक्रारदारांना मुद्देमाल परत देण्याचे आदेश प्राप्त करून घेतले. त्यानंतर हा मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतर करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात तक्रारदारांना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांच्या हस्ते सुमारे एक कोटी ९२ हजार ६२२ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.

या वेळी तक्रारदारांनी जिल्हा पोलिस दलाचे आभार मानले. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी प्रास्ताविक केले. पोलिस अधीक्षक बारकुंड, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

वाहिदअली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT