cotton seeds sakal
उत्तर महाराष्ट्र

कापसाचे 1 लाख 11 हजाराचे बोगस बीटी बियाणे जप्त

बोगस एचटीबीटी (HBT) कापूस बियाण्यांची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : बोगस एचटीबीटी (HBT) कापूस बियाण्यांची साठवणूक करून विक्री करणाऱ्या पिंपळोद (ता.नंदुरबार) येथील एकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यात एक लाख ११ हजाराचे बोगस बी. टी. कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे.

पिंपळोद (ता.नंदुरबार) गावात कृषी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांच्या पथकाने धाड टाकून राज्यात विक्रीवर बंदी असलेले एचबीटी कापूसचे ९७ पाकिटे म्हणजेच एक लाख ११ हजार किमतीचे जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बोगस बियाणे साठवणूक व विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. पिंपळोद गावात विनापरवाना बोगस एचबीटी कापूस बियाण्यांची साठवणूक करून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना मिळाली. होती. श्री. पाडवी यांनी आपल्या पथकासह नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद येथील नीलेश पाटील याच्या घरावर धाड टाकली असता बोगस एचबीटी कापसाचे बियाणे आढळून आले.

कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने गोल्डन -५ फोरजीचे ७२ पाकिटे तसेच शिवम कापसाचे २५ पाकीट असे एकूण ९७ पाकीट जप्त केले. या पाकिटांची किंमत १ लाख ११ हजार ४०० रुपये आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांच्या फिर्यादीवरून नीलेश राजाराम पाटील ( रा.पिंपळोद ता.नंदुरबार ), बियाणे कंपनीचे मालक, बियाणे वाहतूक करणारे या तिघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी महेश विसपुते, कृषी अधिकारी श्री. हिवराळे यांच्या सहकार्याने विभागीय सहसंचालक विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्‍वर, जि.प.कृषी विकास अधिकारी लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT