one rakhi and one member application form by debt-free farmer women. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : 1 राखी, 1 सदस्य अर्ज भेट अभियान

सकाळ वृत्तसेवा

साक्री (जि. धुळे) : एकीकडे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी होऊन अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असताना तसेच तालुक्यात देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असताना सामान्य शिवसैनिक मात्र शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहेत.

या अनुषंगानेच युवती सेनेच्या विस्तारात तथा जिल्हा समन्वयक प्रियांका जोशी यांनी अभिनव उपक्रमातून हाती घेतला असून, यातून अधिकाधिक कर्जमुक्त शेतकरी महिलांना शिवसेनेसोबत जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. (1 Rakhi 1 Member Application Visit Mission by shivsena Dhule Latest Marathi News)

येत्या रक्षाबंधन निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्जमुक्त शेतकरी महिलांकडून एक राखी व एक सदस्य अर्ज भेट देण्याचे अभियान प्रियांका जोशी यांनी सुरू केले आहे.

यासाठी त्या तालुक्यातील गावागावात कर्जमुक्त शेतकरी महिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून एक राखी व एक सदस्य अर्ज भरून घेत असून, या सर्व राखी व अर्ज त्या रक्षाबंधनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.

सोमवारी (ता.१) दिवसभरात त्यांनी दोनशेहून अधिक अर्ज व राखी संकलित केल्या असून, तालुक्यातून जास्तीत जास्त राखी आणि अर्ज संकलित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

Associated Media Ids : SKS22B01515

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT