Class room recorded in Zilla Parishad School. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या 103 खोल्या धोकादायक; निर्लेखित करूनही वर्गखोल्या जैस थे

जगन्नाथ पाटील -सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP School : धुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या एकशे तीन खोल्या मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्या आहेत. त्यांना निर्लेखित करण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे.

मात्र निर्णय होवूनही वर्गखोल्या तशाच असल्याने या वर्गखोल्या सर्वांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे मंजूर वर्गखोल्या तत्काळ पाडण्याची मागणी पालकांनी केली आहे.(103 room of Zilla Parishad Schools are dangerous dhule zp school news)

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अनेक वर्गखोल्या जुन्या झाल्याने त्या नवीन बांधण्यास मंजूर देत वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आलेल्या आहे. मात्र हा निर्णय होवून अनेक चार महिने उलटून असले तरी या वर्गखोल्या जैसे थे असून त्या आता विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी धोकादायक बनल्या आहे.

अनेकदा विद्यार्थी खेळताना नकळत वर्ग खोल्यांकडे पळतात, खेळतातही. अशा स्थितीत नकळत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या वर्गखोल्या अद्याप का पाडण्यात आल्या नाही असा सवाल आता पालक करीत आहे.

निर्लेखित शाळा व वर्गखोल्या

धनूर - १, महालरावट नेर १, नवलाणे - ४, सुकवड - १, कुंडाणे - ५, वरखेडे - ८, चिंचखेडे - ९, मोराणे - ५, आंबोडे - ४, आमदड - २, अंचाडे - १, अंचाडेताडे - १, काळखेडे - ५, वडजाई - २, शिरूड - २१, गरताड -१, धाडरी - १, जून्नेर - २, मळाणे - २, उभंड - ५, नंदाळे - १, हेंकळवाडी - १, पिंप्री - १, आर्वी - १, मोघण - १, सुट्रेपाडा - १, बोरविहीर - ६, रानमळा - ४, मोरदडतांडा - १, शिरडाणे प्र.डा.- ४, भिरडाणे - २ व पाडळदे - १.

दुरुस्ती सुरु असलेल्या शाळा

शिरडाणे, गोताणे, विश्वनाथ, वडगाव, पुरमेपाडा, चिंचवार, खोरदडतांडा, कुंडाणे, बाबरे, निकुंभे, काळखेडा, नांद्रे, अवधान, कुळथे, बेहेड, वरखेडी, आनंदखेडे, सायने, सरवड, कावठी, चिंचवार, पुरमेपाडा, काळखेडा आदी शाळांमध्ये इमारत दुरुस्तीची काम सुरु आहेत.

काम सुरू न झालेल्या शाळा

आर्णी, कुंडाणे, कोठारे, गोंदूर, कापडणे, वणी, कुंडाणे(वरखेडे), जापी, वडणे, सोनगीर, खंडलाय, उभंड, नेर, सुट्रेपाडा व सैताळे येथील शाळांमधील वर्गखोल्यांची कामे सुरु झालेली नाहीत.

''धनूर शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्या निर्लेखित झाल्या आहेत. त्यांना पाडण्यासाठी शासनाने योग्य कार्यवाही करावा. अन्यथा अपघात झाल्यास त्यास संबंधित विभाग जबाबदार राहील.''- चेतन शिंदे, सरपंच धनूर-लोणकुटे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT