उत्तर महाराष्ट्र

यात्रेचा 13 ट्रॅक्टर कचरा उचलला ; कोटमगाव चकाचक

सकाळवृत्तसेवा

येवला : नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस भरलेली कोटमगाव येथील यात्रा उठली. पण मागे प्रचंड घाण व कचरा राहिला. यामुळे विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याठिकाणी भव्य स्वछता मोहिम राबवून यात्रेचा 13 ट्रॅक्टर कचरा उचलत कोटमगाव चकाचक केले.

देवीमंदिर परिसर येथे तालुका व तालुक्याच्या बाहेरील लोक घटी बसण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. याकाळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरली, खाद्यपदार्थांसह विविध दुकाने लागली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. दुष्काळी परिस्थितीमुळे विविध संसर्गजन्य आजाराचे प्रमाणही वाढले असून त्याठिकाणी स्वच्छता करणे व त्याबद्दल जनतेमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याने मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेचे उद्घाटन दूध संघाचे संचालक शरद लहरे, सरपंच नामदेव माळी,ग्रामसेवक सचिन कोल्हापुरे,प्रवीण लहरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. 213 स्वयंसेवकांनी मोहिमेची सुरवात सकाळी साडेसात वाजता अन् काही तासांत मंदिर परिसर, मंदिरपरिसरास जोडणारे दोन्ही संपूर्ण रोड ते गावाबाहेर गटवारी करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

13 टॅक्टर कचरा उचलून ओला व सुका विभाजीत करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता अभियानात संस्थेचे विश्वस्त भूषण लाघवे, प्राचार्य डी.के.कदम,प्रा.अक्षय बळे,प्रा.जितेंद्र निकम,प्रा.अमोल धांद्रे,प्रा.किरण ढमाले व विद्यार्थी स्वयंसेवकानी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT