Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पगारासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार 15 हजार! निवृत्तांसह सफाई कर्मचाऱ्यांना प्राधान्य

रमाकांत घोडराज

Dhule News : महापालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना अद्यापही पूर्णपणे सातव्या वेतन आयोगाचा फरक अदा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक व भविष्य निर्वाह निधीत जमा करावयाच्या रकमेबाबत धोरण निश्‍चित केले आहे.

त्यानुसार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी दरमहा १५ हजार रुपये अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यापासूनच कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


केंद्र, राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर याचा लाभ मिळाला. आता तर आठव्या वेतन आयोगाची मागणी अधिकारी-कर्मचारी करू लागले आहेत. दरम्यान, धुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मात्र अद्यापही सातव्या वेतन आयोगाचा पूर्णपणे लाभ मिळालेला नाही.

अर्थात यातील काही वशिलेबाजांनी शंभर टक्के रक्कम प्राप्त करून घेतली, काहींनी ५० टक्के रक्कम मिळविली. इतर कर्मचाऱ्यांना मात्र असा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या लाभाबाबत मागणी करताना पाहायला मिळतात.

दरम्यान, आता आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी सातवा वेतन आयोग फरक व भविष्यनिर्वाह निधी वितरणाबाबत धोरण निश्‍चित केले आहे. या धोरणानुसार कार्यवाही करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी मुख्य लेखाधिकाऱ्यांना दिला आहे.

दरमहा १५ हजार

सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी निवृत्त कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा १५ हजार रुपये पगारासोबत अदा करावेत.

मंजूर पदावरील कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगाच्या फरकाची रक्‍कम अदा करण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिले असल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये.

यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने फरकाची रक्‍कम अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे अतिरिक्त आयुक्त श्रीमती डहाळे यांनी आदेशात म्हटले आहे. ही कार्यवाही सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर-२०२३ च्या वेतनापासून अंमलबजावणी करण्यात यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार ‘पीएफ’

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत चार हप्त्यांची रक्‍कम जमा करताना सर्व प्रथम निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या तारखेच्या सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करून दरमहा पाच कर्मचाऱ्यांना रक्‍कम अदा करण्यात यावी. यातही सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांपासून सुरवात करण्यात यावी.

निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व रक्‍कम अदा झाल्यानंतर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीत दरमहा दहा कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी खात्यावर सेवाज्येष्ठतेनुसार रक्कम अदा करण्यात यावी. यातही सर्व प्रथम सफाई कर्मचाऱ्यांपासून सुरवात करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या घटनास्थळी दाखल

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SCROLL FOR NEXT