Truck Accident with tata ace
Truck Accident with tata ace esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : ट्रकच्या समोरासमोर धडकेत 2 जखमी

सकाळ वृत्तसेवा

खेडदिगर (जि. नंदुरबार) : शहादा-खेतिया रस्त्यावर,खेडदिगर नजीक डाकबंगला फाट्याजवळ, कौलाने भरलेल्या आयशर ट्रकने (truck), छोट्या मालवाहू वाहनाला धडक दिली. आयशर ट्रक पलटी (Accident Case) होऊन यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना खेतिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. (2 injured in truck accident Nandurbar accident News)

शहादा खेतिया मुख्य रस्त्यावर खेडदिगर नजीक उभ्या असलेल्या टाटा छोटा हत्ती (एमएच ४८ एजी ११२५) टरबुजाने भरून उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला, शहाद्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या, कौल भरलेल्या आयशर ट्रक, (डीएल १ एम ८१७०) धडक दिली. त्यात आयशर पलटी होऊन त्यामधील चालक व मजूर जखमी झाले आहेत. जखमींना खेतिया रूग्णालयातून त्यांना पुढील उपचारासाठी बडवानी येथे हलविण्यात आले. करण मयाराम शस्ते (वय २१), विक्रम तुकाराम शस्ते (वय २२) रा. - सावरीयापानी, जिल्हा- बडवानी, (मध्य प्रदेश) येथील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT