the Municipal Corporation team while sealing the arrears of the market committee. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : थकबाकी भरपूर, कारवाई थातुरमातुर! एका थकबाकीदाराचे 2 गाळे सील

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील रहिवासी मालमत्तांपोटी कोट्यवधी रुपये थकबाकीचा प्रश्‍न असताना दुसरीकडे शहरातील विविध व्यापारी संकुलांतील व्यावसायिक गाळ्यांपोटीची थकबाकीदेखील मोठी असल्याचे सांगितले जाते.

महापालिकेकडून मात्र थातुरमातुर कारवाई केली जाते. (2 shop seal of defaulters by municipal corporation dhule news)

त्यामुळे व्यावसायिक वापर करून रोज पैसे कमावणाऱ्यांनाही एकप्रकारे महापालिकेकडून अभय दिले जात असल्याचे दिसते.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २०) शहरातील धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दोन व्यापारी गाळे सील केले. सरला सुनील जैन यांचे गाळा क्रमांक ५६ व ५७ च्या मालमत्ता कर थकबाकीपोटी एकूण एक लाख ८३ हजार २२ रुपये थकबाकी होती.

ही थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या पथकाने गाळे सील केले. वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर वडनेरे, अनिल सुडके, किशोर बागूल, राजेंद्र गवळी, दगडू पाटील, अशोक मंगीडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

व्यावसायिकांनाही अभय?

एकीकडे शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. यात रहिवासी मालमत्तांचा प्रामुख्याने समावेश आहे. तब्बल ५८ कोटी थकबाकी, ३३ कोटी शास्ती, ४० कोटी पाणीपट्टी अशा एकूण १३१ कोटी रुपये थकबाकीपैकी केवळ २१ कोटी रुपये आतापर्यंत वसुली झाली आहे. एकीकडे असे चित्र असताना महापालिकेकडून धडक कारवाई दिसत नाही.

रहिवासी मालमत्ताधारकांकडे कारवाई करताना एकवेळ विविध कारणांचा विचार करावा लागतो. मात्र, व्यावसायिक मालमत्ता बाळगून त्यातून पैसे कमावणाऱ्यांवरदेखील कारवाई होत नाही ही खटकणारी बाब आहे. एकीकडे महापालिकेची तिजोरी रिकामी असताना महापालिका मालकीच्या व इतर व्यापारी संकुलांतील गाळेधारकांकडूनही महापालिकेला थकबाकी वसूल करता येत नाही, ही शोकांतिका आहे.

महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांपोटी संबंधित ठेकेदार एकेका गाळ्याचे लाख-लाख भाडे वसूल करतो. महापालिकेच्या तिजोरीत मात्र एक रुपया जमा होत नाही, असे गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्य हर्षकुमार रेलन यांनी सांगितले. हा गंभीर प्रश्‍न असताना याबाबत महापालिकेकडून काहीही ठोस कार्यवाही, धडक कारवाई केली जात नाही.

थकबाकीही माहीत नाही

शहरात शेकडो व्यापारी गाळे आहेत, यापैकी अनेक गाळेधारकांकडे थकबाकी असल्याचे अधिकारी म्हणतात. मात्र, नेमकी थकबाकी किती हे त्यांना सांगता येत नाही. या वर्षी आतापर्यंत १५-२० गाळेधारकांवर कारवाई झाल्याचे अधिकारी म्हणतात.

मात्र अनेक दिवसांनंतर एखाददुसरे गाळे सील करून थकबाकी वसुलीचा देखावा करण्याला काहीही अर्थ उरत नाही हेही तेवढेच खरे. त्यामुळे किमान व्यावसायिक गाळेधारकांकडून थकबाकी वसुलीचा प्रश्‍न महापालिका प्रशासनाने प्राधान्याने व गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT