crime esakal
उत्तर महाराष्ट्र

पतीपत्नीचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न पडला महागात

सचिन पाटील.

शिरपूर (धुळे) : पतीपत्नीचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नागरिकाला चांगलाच महागात पडला. दोन महिलांनी त्याला बेदम मारहाण केली. संशयित महिलांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना दुपारी चारला भाटपुरा (ता.शिरपूर) येथे घडली. गणेश गोविंदा जाधव (वय ६२) असे जखमी पुरुषाचे नाव आहे. त्याच्या घरासमोर रेखाबाई रमेश जाधव हिचे तिच्या पतीसोबत भांडण सुरु होते. तेथे मध्यस्थी करण्यासाठी गणेश जाधव गेले. त्याचा राग आल्याने रेखाबाई जाधव व सतीबाई जाधव यांनी त्यांना मारहाण केली. रेखाबाईने त्यांच्या डोक्यात काठी टाकली व डाव्या हाताचा चावा घेतला. त्यांच्या गुडघ्यावरही मारहाण केली. सतीबाईने हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संशयित महिलांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT