gram panchayat election esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Gram Panchayat : 20 ग्रामपंचायतींत 28 रिक्त जागा; पारंपरिक पद्धतीने पोटनिवडणुकीचा कायक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Gram Panchayat : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदती संपणाऱ्या शिरपूर तालुक्यातील १५, साक्री तालुक्यातील ३, शिंदखेडा तालुक्यातील १३ अशा एकूण ३१ ग्रामपंचायतीच्या सदस्य व थेट सरपंचपदासह सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा, तसेच धुळे तालुका ९, शिरपूर तालुका १, शिंदखेडा तालुका ३ व साक्री तालुका ७ अशा एकूण २० ग्रामपंचायतींतील रिक्त २८ जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. (28 Vacancies in 20 Gram Panchayat election dhule news)

सामान्य प्रशासन शाखेचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी सांगितले, की राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३१ ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे करण्यात येईल. वीस ग्रामपंचायतींतील पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील.

नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या तारखेपासून बारा महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र देण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे.

संबंधित निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT